नवी दिल्ली 26 एप्रिल : आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 2022 (IPL 2022) मोसमाला 26 मार्चपासून सुरूवात झाली. यंदाच्या मोसमाची फायनल 29 मे रोजी होणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात गुजरात आणि लखनऊच्या 2 टीम वाढल्या आहेत, त्यामुळे टीमची संख्या 10 आहे. नवीन असलेल्या दोन्ही संघांचा चांगला खेळ यंदाच्या मोसमात पाहायला मिळाला. कोरोना व्हायरस आणि बायो-बबलच्या नियमांमुळे प्रवास टाळण्यासाठी स्पर्धेच्या लीग स्टेजच्या सामन्यांचं आयोजन मुंबई-पुण्यात करण्यात आलं आहे. मुंबईतल्या वानखेडे, ब्रेबॉर्न, नवी मुंबईतल्या डी.वाय.पाटील आणि पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर आयपीएल सामने खेळवले जात आहेत. आयपीएल ही जगातली सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. अनेक देशांतील क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळतात, त्यासाठी लिलावात त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांची बोली लागते. आयपीएलमधील 10 टीमचे मालक अनेक खेळाडूंना कोट्यावधी रुपयांना विकत घेतात. पण आयपीएलमध्ये फक्त खेळाडूच नाही, तर अंपायर्सना (Umpires Fee in IPL) देखील एका सिझनसाठी लाखो रुपये मानधन दिलं जातं. कोणत्याही खेळात पंचाची भूमिका फार महत्त्वाची आणि निर्णायक असते. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्येही अंपायरची भूमिका निर्णायक आणि जबाबदारीची असते. मॅचमधील प्रत्येक बॉलवर बारीक लक्ष ठेवणं हे त्यांचं काम आहे. बॉलरच्या बॉलिंगपासून ते बॅट्समनच्या शॉटपर्यंत अंपायरला नीट लक्ष द्यावं लागतं. या जबाबदारीच्या कामासाठी अंपायर्सना चांगलं मानधनदेखील दिलं जातं. IPL 2022 : म्हणून ऋषी धवनने फेस शिल्ड घालून केली बॉलिंग, वाचा धक्कादायक Inside Story यंदाच्या मोसमात प्रत्येक अंपायरला 7 लाख 33 हजार रुपये एवढी रक्कम निश्चित मानधन स्वरुपात देण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक सामन्यामध्ये अम्पायरिंग करण्यासाठी ते वेगळी रक्कम आकारतात. प्रत्येक अंपायरची फी वेगवेगळी असते. Cricketnmore.comने यासंदर्भात वृत्त दिलंय. दरम्यान, ICC च्या एलिट पॅनलमधील अंपायर्सना 1.98 लाख रुपये प्रत्येक मॅचसाठी मिळतात. तर, डेव्हलपमेंट अंपायर्सना एका मॅचसाठी 59 हजार रुपये मानधन मिळतं. क्रिस्टोफर गॅफ्रे (Christopher Gaffrey), रिचर्ड इलिंगवर्थ (Richard Illingworth), नितीन मेनन (Nitin Menon) आणि पॉल रेफेल (Paul Reiffel) हे IPL 2022 मध्ये एलिट पॅनलमधील अंपायर्स आहेत. गावसकरांच्या पार्टनरची 66व्या वर्षी नवी इनिंग, 28 वर्ष लहान तरुणीसोबत करणार लग्न अनिल चौधरी (Anil Chaudhary), चेट्टीथोडी शमशुद्दीन (Chettithody Shamshuddin), विनीत कुलकर्णी (Vineet Kulkarni), एस. रवी (S Ravi), वीरेंद्र शर्मा (Virender Sharma), यशवंत बर्डे (Yashwant Barde), उल्हास गंधे (Ulhas Gandhe), अनिल दांडेकर (Anil Dandekar), के. श्रीनिवासन (K Srinivasan), पश्चिम पाठक (Pashchim Pathak), के. एन. अनंतपद्मनाभम (K N Ananthpadmanabham) हे सर्व IPL 2022 मधील डेव्हलपमेंट अंपायर्स आहेत. सुंदरम रवी, अनिल चौधरी, कुमार धर्मसेना, चेट्टीथोडी शमशुद्दीन, मारियस इरास्मस, सीके नंदन, विनीत कुलकर्णी, इयान गोल्ड हे यंदाच्या आयपीएलमधील सर्वांत जास्त फी घेणारे अंपायर्स आहेत. ते प्रतिमॅच 3 हजार डॉलर मानधन घेतात.