advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / गावसकरांच्या पार्टनरची 66व्या वर्षी नवी इनिंग, 28 वर्ष लहान तरुणीसोबत करणार लग्न

गावसकरांच्या पार्टनरची 66व्या वर्षी नवी इनिंग, 28 वर्ष लहान तरुणीसोबत करणार लग्न

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले अरुण लाल (Arun Lal Marriage) वयाच्या 66 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न करत आहेत. अरुण लाल यांची होणारी पत्नी बुलबुल साहा (Bulbul Saha) 38 वर्षांची म्हणजेच अरुण लाल यांच्यापेक्षा 28 वर्ष लहान आहे.

01
भारताचे माजी ओपनर अरुण लाल (Arun Lal) वयाच्या 66 व्या दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत. बुलबुल साहा (Bulbul Saha) त्यांच्या होणाऱ्या पत्नीचं नाव आहे. बुलबुल 38 वर्षांच्या आहेत, म्हणजेच अरुण लाल आणि बुलबुल यांच्यात 28 वर्षांचं अंतर आहे. अरुण आणि बुलबुल बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत आहेत, तसंच दोघांची मैत्रीही जुनी आहे.

02
अरुण लाल यांनी लग्नाच्या पत्रिका छापल्या आहेत, तसंच पत्रिका वाटपही सुरू झालं आहे. अरुण आणि बुलबुल यांचं लग्न 2 मे रोजी कोलकात्याच्या पियरलेस इन हॉटेलमध्ये होणार आहे. लग्नानंतर मोठं रिसेप्शनही केलं जाणार आहे.

03
अरुण लाल यांनी पहिलं लग्न रीना सोबत केलं होतं, पण दोघांनी सहमतीने घटस्फोट घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रीना बऱ्याच काळापासून आजारी आहेत, त्यांच्या मर्जीनेच अरुण दुसरं लग्न करत आहेत. अरुण आणि बुलबुल यांनी एक महिना आधीच साखरपुडा केला, पण दोघं बराच काळ रिलेशनशीपमध्ये आहेत.

04
अरुण लाल यांचा जन्म 1 ऑगस्ट 1955 साली उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये झाला. बंगालकडून त्यांनी स्थानिक क्रिकेट खेळलं. लग्नासाठी अरुण लाल यांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी, सहकारी क्रिकेटपटू आणि जवळच्या व्यक्तींना आमंत्रण दिलं आहे. अरुण लाल यांना 2016 साली कॅन्सर झाला होता, त्यामुळे त्यांनी कॉमेंट्री करणं सोडून दिलं. कॅन्सरला मात देऊन त्यांनी बंगाल टीमच्या कोचिंगला सुरूवात केली.

05
अरुण लाल यांनी त्यांच्या क्रिकेट करियरमध्ये 16 टेस्ट आणि 13 वनडे खेळल्या, यात त्यांनी टेस्टमध्ये 729 आणि वनडेमध्ये 122 रन केल्या, त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करता आलं नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लाल यांना सुनिल गावसकरांसोबत ओपनिंगला खेळण्याची संधी मिळाली.

06
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 156 मॅच खेळल्या, यात 30 शतकांच्या मदतीने त्यांनी 10421 रन केले. अरुण लाल यांनी पहिली आंतरराष्ट्रीय मॅच 27 जानेवारी 1982 साली इंग्लंडविरुद्ध कटक वनडे खेळली. तर शेवटची मॅच एप्रिल 1989 साली वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्सटन टेस्ट खेळली.

  • FIRST PUBLISHED :
  • भारताचे माजी ओपनर अरुण लाल (Arun Lal) वयाच्या 66 व्या दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत. बुलबुल साहा (Bulbul Saha) त्यांच्या होणाऱ्या पत्नीचं नाव आहे. बुलबुल 38 वर्षांच्या आहेत, म्हणजेच अरुण लाल आणि बुलबुल यांच्यात 28 वर्षांचं अंतर आहे. अरुण आणि बुलबुल बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत आहेत, तसंच दोघांची मैत्रीही जुनी आहे.

    MORE
    GALLERIES