मुंबई, 25 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) पंजाब किंग्स आणि सीएसके (Punjab Kings vs CSK) यांच्यातल्या सामन्यात ऑलराऊंडर ऋषी धवन (Rishi Dhawan) पहिल्यांदाच मैदानात उतरला. 2016 नंतर आयपीएल मॅच खेळण्याची धवनला पहिल्यांदाच संधी मिळाली. 2013 साली धवन त्याची पहिली आयपीएल मॅच खेळला होता, तेव्हाही तो पंजाबच्याच टीममध्ये होता. सीएसकेविरुद्धच्या या सामन्यात त्याला बॅटिंगची संधी मिळाली नाही, पण बॉलिंगला आल्यानंतर तो चर्चेत आला आहे. ऋषी धवन फेस शिल्ड (Face Shield) घालून बॉलिंग करत होता, याचं नेमकं कारण काय? असा प्रश्न मॅच बघत असणाऱ्या अनेकांना पडला. आयपीएल सुरू व्हायच्या आधी ऋषी धवन रणजी ट्रॉफीमध्ये खेळत होता, त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर बॉल लागला होता, यानंतर त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रियाही करण्यात आली. याच कारणामुळे पंजाब किंग्ससाठी पहिल्या 4 मॅच उपलब्ध नव्हता. चेहऱ्याला दुखापत झाल्यानंतर ऋषी धवनच्या नाकावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आणखी दुखापत होऊ नये, म्हणून तो फेस शिल्ड घालून बॉलिंग करत होता. पंजाब किंग्सनी सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ देखील शेयर केला आहे, या व्हिडिओमध्ये तो नेट प्रॅक्टिसमध्येही फेस शिल्ड घालून खेळताना दिसत आहे.
What's more dangerous than a lion? 𝘼 𝙝𝙪𝙣𝙜𝙧𝙮 𝙡𝙞𝙤𝙣. #SherSquad, tune in to this video to find out the reason behind @rishid100's initial absence & how he is all set for a roaring comeback now 👊#SaddaPunjab #PunjabKings #IPL2022 #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #RishiDhawan pic.twitter.com/mnKKULSSrz
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 24, 2022
ऋषी धवन 6 वर्षांनंतर त्याची 27वी आयपीएल मॅच खेळत आहे. मे 2016 साली धवन त्याची मागचा आयपीएल सामना खेळला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ऋषी धवन चांगल्या फॉर्ममध्ये आहे, याच कारणामुळे पंजाब किंग्सने लिलावात त्याला 55 लाख रुपयांना विकत घेतलं.