JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : पहिल्याच मॅचमध्ये Monster Six मारणारा RCB चा 22 वर्षांचा खेळाडू कोण आहे?

IPL 2022 : पहिल्याच मॅचमध्ये Monster Six मारणारा RCB चा 22 वर्षांचा खेळाडू कोण आहे?

पंजाब किंग्सचा (Punjab Kings) फिरकी गोलंदाज राहुल चहर (Rahul Chahr) याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) युवा फलंदाज अनुज रावत (Anuj Rawat) याला क्लीन बोल्ड केले. 20 चेंडूत 21 धावा करून अनुज बाद झाला. या धावांत त्याने 2 षटकार आणि 1 चौकार मारून त्याने या आयपीएलमध्ये धमाका करण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिले.

जाहिरात

anuj Rawat

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 मार्च: पंजाब किंग्सचा (Punjab Kings) फिरकी गोलंदाज राहुल चहर (Rahul Chahr) याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) युवा फलंदाज अनुज रावत (Anuj Rawat) याला क्लीन बोल्ड केले. 20 चेंडूत 21 धावा करून अनुज बाद झाला. या धावांत त्याने 2 षटकार आणि 1 चौकार मारून त्याने या आयपीएलमध्ये धमाका करण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिले. संदीप शर्मा डावातील तिसरे षटक टाकत होता आणि या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अनुजने सहज षटकार ठोकला. त्याच्या या षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर जाणून घेऊया हा 22 वर्षी अनुज रावत आहे तरी कोण? अनकॅप्ड खेळाडूंमध्ये दिल्लीकडून खेळणाऱ्या अनुज रावतला RCB ने तब्बल 3.40 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. अनुज रावत हा उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील एका छोट्या गावातील डावखुरा फलंदाज आहे. तो शेतकरी कुटुंबातून आला असून अनुज रावतचे वडील तरुणपणी क्रिकेट खेळायचे. IPL 2022 : पहिल्या मॅचमध्येच Viral झालेली Mystery Girl कोण आहे? नाव आणि Photo आले समोर अनुजच्या रुपूर गावात क्रीडा सुविधा नव्हती. प्रतिभावान यष्टीरक्षक फलंदाजाला त्याच्या घरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या रामनगरमध्ये सोयी सापडल्या. अनुज हळूहळू प्रगती करत गेला आणि नंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीचे बालपण प्रशिक्षक राजकुमार शर्मा चालवलेल्या पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीमध्ये सामील झाला. पण अनुजची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने व्यावसायिक स्तरावर क्रिकेट खेळण्याचे त्यांचे स्वप्न सुरू ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला कर्जाची व्यवस्था करावी लागली. रावतचे वडील वीरेंद्र पाल सिंह रावत यांनी 2018 मध्ये द स्टेट्समनला सांगितले की, ‘मी माझ्या तरुणपणी क्रिकेट खेळायचो आणि माझ्या मुलाने क्रिकेट खेळावे हे माझे स्वप्न होते. अनुज लहान असताना तो बॅट सरळ धरायचा. माझ्या मुलाला व्यावसायिक क्रिकेट खेळायचे असेल तर त्याला नवी दिल्लीत प्रशिक्षणासाठी पाठवा, असा सल्ला त्याचे प्रशिक्षक सतीश पोखरियाल यांनी दिला होता. अनुज भारतीय अंडर-19 संघाचा कर्णधार झाला अनुज रावत आपल्या मेहनतीच्या जोरावर भारतीय अंडर-19 संघात पोहोचला आणि लवकरच कर्णधार बनला. अनुज रावतने श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व केले, ज्यामध्ये महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देखील होता. 22 वर्षीय अनुज रावतने आपल्या छोट्या कारकिर्दीत गौतम गंभीर आणि इशांत शर्मा यांच्यासोबत सराव केला आणि भारतीय क्रिकेटच्या या दोन दिग्गजांकडून क्रिकेटमधील मौल्यवान बारकावे शिकले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या