रवींद्र जाडेजा
मुंबई, 03 सप्टेंबर: टीम इंडि.याचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला दुखापतीमुळे आगामी आशिया चषकातील सामन्यातून संघाबाहेर जावं लागलं आहे. पण आता टीम इंडियासाठी आणखी एक चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. आशिया चषकाच्या साखळी सामन्यांदरम्यान जाडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्या गुढग्यावर आता मोठी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यातून सावरण्यासाठी जाडेजाला बराच वेळ लागेल. त्यामुळे आगामी टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतूनही रवींद्र जाडेजाला मुकावं लागणार आहे. आशिया चषकादरम्यान दुखापत हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यानंतर जाडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. सध्या बीसीसीआयचं वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेऊन आहे. आशिया चषकावेळी भारतीय संघाची निवड करताना अक्षर पटेल, श्रेयस अय्यर आणि दीपक चहर या तिघांना स्टँडबाय खेळाडू म्हणून ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे जाडेजाच्या जागी आशिया चषकात अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आलं. पण आता विश्वचषक संघाची मोर्चेबांधणी करताना भारतीय संघासमोरच्या अडचणी वाढणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जाडेजाला या दुखापतीतून सावरण्यासाठी जवळपास सहा महिने लागू शकतात. आगामी विश्वचषक अवघ्या महिन्याभरावर आला आहे. त्यामुळे जाडेजाशिवाय टीम इंडियाला ऑस्ट्रेलियातल्या विश्वचषक मोहिमेला निघावं लागणार आहे. आहेपाकिस्तानविरुद्ध मॅचविनिंग खेळी आशिया चषकात टीम इंडियाच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयात जाडेजानं महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती. जाडेजाच्या निर्णायक खेळीमुळे पाकिस्ताननं दिलेलं आव्हान टीम इंडियानं सहज पार केलं. जाडेजानं त्या सामन्यात 35 धावांची खेळी करताना हार्दिक पंड्यासह निर्णायक भागीदारीही साकारली होती.