JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Arjun Tendulkar : सचिनच्या मुलाचा पदार्पणातच धमाका, अर्जुनचं वडिलांच्या पावलावर पाऊल

Arjun Tendulkar : सचिनच्या मुलाचा पदार्पणातच धमाका, अर्जुनचं वडिलांच्या पावलावर पाऊल

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातच धमाका केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 डिसेंबर : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातच धमाका केला आहे. गोव्याकडून आपली पहिलीच रणजी ट्रॉफी मॅच खेळताना अर्जुन तेंडुलकरने शतक केलं आहे. अर्जुनने 179 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याचा सामना राजस्थानविरुद्ध होत आहे. 23 वर्षांच्या अर्जुनचा हा पहिलाच सामना आहे. सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या अर्जुनने उत्कृष्ट बॅटिंग करत राजस्थानच्या बॉलिंगचा समाचार घेतला. अर्जुन तेंडुलकरने 178 बॉलमध्ये शतक केलं, ज्यात 12 फोर आणि 2 सिक्सचा समावेश आहे. याशिवाय त्याने 26 सिंगल, 7 डबल रनही केल्या. 56 च्या स्ट्राईक रेटने केलेल्या या खेळीत अर्जुनने 131 डॉटबॉल खेळले. अर्जुन तेंडुलकरने या इनिंगमध्ये सुयश प्रभुदेसाईसोबत रेकॉर्ड 200 पेक्षा अधिक रनची पार्टनरशीप केली. दोघांनी 333 बॉलमध्ये 200 रन केले, यात अर्जुनचं योगदान सर्वाधिक होतं. सचिनचंही रणजी पदार्पणात शतक सचिन तेंडुलकरनेही रणजी ट्रॉफीच्या पदार्पणात शतक केलं होतं, तेव्हा हा विक्रम करणारा सचिन सगळ्यात युवा खेळाडू होता. 1988 साली सचिनने 15 वर्ष 231 दिवसांचा असताना पदार्पणातच शतक केलं होतं. सचिनचं हे शतक गुजरातविरुद्ध आलं होतं. रणजी ट्रॉफी पदार्पणात शतक सचिन तेंडुलकर- 15 वर्ष 231 दिवस (गुजरातविरुद्ध) अर्जुन तेंडुलकर- 23 वर्ष 81 दिवस (राजस्थानविरुद्ध) याच वर्षी गोव्यात शिफ्ट 23 वर्षांचा अर्जुन तेंडुलकर ऑलराऊंडर आहे, आपल्या डावखुऱ्या फास्ट बॉलिंगने अर्जुन बरेच वेळा चर्चेत आला, पण यावेळी त्याने बॅटिंगमध्ये कमाल दाखवली. अर्जुन तेंडुलकर पहिले मुंबईच्या टीममध्ये होता, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे त्याने या मोसमात गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. यानंतर लगेचच पहिल्या सामन्यात अर्जुनने शतक ठोकलं. अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससोबत आहे, पण मागच्या दोन वर्षांपासून त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. अर्जुनला मुंबईने पहिल्या मोसमात 20 लाख आणि पुढच्या मोसमात 30 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. अर्जुनच्या नावावर रणजीमध्ये शतक झालं आहे, त्यामुळे आता आयपीएलमध्येही त्याचं लवकरच पदार्पण होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या