JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पृथ्वी शॉ निवड समितीवर नाराज, संघ जाहीर होताच DP केला रिमूव्ह अन्....

पृथ्वी शॉ निवड समितीवर नाराज, संघ जाहीर होताच DP केला रिमूव्ह अन्....

चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी संघाची निवड केली. तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी निवडलेल्या संघात पृथ्वी शॉला संधी देण्यात आलेली नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 डिसेंबर : नव्या वर्षात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. मंगळवारी 27 डिसेंबर रोजी निवड समितीने श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी संघाची घोषणा केली. दोन्हीपैकी कोणत्याच संघात पृथ्वी शॉचे नाव नाही. यामुळे पृथ्वी शॉने त्याची नाराजी सोशल मीडियावरून उघडपणे व्यक्त केली. श्रीलंकेविरुद्ध 3 जानेवारीला टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी संघाची निवड केली. तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी निवडलेल्या संघात पृथ्वी शॉला संधी देण्यात आलेली नाही. तर ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांना सलामीवीर म्हणून संघात घेतलं आहे. निवड समितीने न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी संघाची निवड करताना म्हटलं होतं की, पृथ्वीला संधी दिली जाईळ. पण आता संधी न मिळाल्याने त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून रिअॅक्शन दिली आहे.

संबंधित बातम्या

हेही वाचा :  ICCच्या क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकन जाहीर, भारताच्या स्टार खेळाडुचा समावेश श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी पृथ्वी शॉला निवड होईल अशी अपेक्षा होती. संघात नाव नसल्यानं त्याने इन्स्टाग्रामवर उघड प्रतिक्रिया दिली आहे. तसंच प्रोफाइल फोटोही हटवला आहे. यानतंर काही व्हिडीओ स्टोरीला टाकले आहेत. यातून पृथ्वी शॉने त्याच्या मनातील भावनाच व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे. एका व्हिडीओत असा मेसेज होता की, एखादी व्यक्ती हसत असेल तर याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती आनंदी आहे. आयुष्यात प्रॉब्लेम तर ऑटोमॅटिक असतात. हेही वाचा :  वर्षाअखेरीस टीम इंडियाला गूड न्यूज, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा असा फायदा संघ जाहीर झाल्यानतंर पृथ्वी शॉने इन्स्टा स्टोरी टाकली होती. त्याच्या काही चाहत्यांनी या स्टोरीचे व्हिडीओ ट्विटरवर शेअर केले आहेत. यानतंर पृथ्वी शॉची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. व्हिडीओ पाहताच संघ जाहीर झाल्यानतंर पृथ्वी शॉच्या भावना काय आहेत ते समजत असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या