JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / FIFA Final : 'सर्वात थरारक सामना', पंतप्रधान मोदींनी केलं अर्जेंटिनाच्या खेळाचं कौतुक

FIFA Final : 'सर्वात थरारक सामना', पंतप्रधान मोदींनी केलं अर्जेंटिनाच्या खेळाचं कौतुक

फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाची पकड मजबूत होती. पण अखेरच्या क्षणी अर्जेंटिनाने आक्रमक खेळ करत सामन्यात पुनरागमन केलं. या सामन्याचा आनंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लुटला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 डिसेंबर : फिफा वर्ल्ड कपमध्ये अखेरपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सला पराभूत केलं. यासह मेस्सीचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतिम सामन्यानंतर अर्जेंटिनाचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्जेंटिनाचे अभिनंदन करणारे ट्विट केलेय. अंतिम सामन्यात शेवटच्या क्षणापर्यंत थरारक अशी लढत बघायला मिळाली. सुरुवातीला अर्जेंटिनाची सामन्यावर पकड होती. पण अखेरच्या क्षणी अर्जेंटिनाने आक्रमक खेळ करत सामन्यात पुनरागमन केलं. या सामन्याचा आनंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लुटला.

संबंधित बातम्या

हेही वाचा :  मेस्सी 2022 चा वर्ल्ड कप जिंकेल; तारखेसह केलेली भविष्यवाणी ठरली खरी मोदींनी म्हटलं की, सर्वात थरारक फुटबॉल सामना म्हणून हा लक्षात राहिल. फिफा वर्ल्ड कप २०२२ चे चॅम्पियन झाल्याबद्दल अर्जेंटिनाच्या संघाचे अभिनंदन. स्पर्धेत त्यांनी शानदार असा खेळ केला. वर्ल्ड कप जिंकल्याने अर्जेंटिना आणि मेस्सीच्या लाखो भारतीय चाहत्यांना आनंद झालाय.

हेही वाचा : FIFA : वर्ल्ड कप जिंकले तरी विजेत्यांना खरी ट्रॉफी देत नाहीत, कारण… अंतिम सामन्यात ८० व्या मिनिटापर्यंत अर्जेंटिनाने २-० अशी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर दोन मिनिटात किलियन एम्बाप्पेने सलग दोन करत सामन्याची रंगत वाढवली. दोन गोल झाल्यानंतर फ्रान्सच्या खेळा़डुंनी आक्रमक खेळ केला. निर्धारीत वेळेत सामना बरोबरीत राहिल्यानंतर अतिरिक्त वेळेत खेळण्यात आला. त्यात १०८ व्या मिनिटाला अर्जेंटिनाने गोल करून आघाडी घेतली. पण पुन्हा त्यानंतर एम्बाप्पेने एक गोल करत पुन्हा सामना बरोबरीत आणला. यामुळे शेवटी पेनल्टी शूटआऊटमध्ये सामन्याचा निकाल लागला. यात फ्रान्सच्या दोघांना गोल करता आला नाही आणि ४-२ ने अर्जेंटिनाने बाजी मारली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या