ravi shastri
मुंबई, 27 एप्रिल: भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनेक बाबींवर भाष्य केले. यादरम्यान त्याने प्रशिक्षणादरम्यान खेळाडूंचा दृष्टिकोन कसा बदलण्याचा प्रयत्न केला हे सांगितले. याशिवाय त्याने खेळाडूंना सडेतोड प्रत्युत्तर द्यायलाही कसे शिकवले हेही त्यांनी यावेळी सांगितले. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना रवी शास्त्री यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये टीम इंडियाला कसे यश मिळाले. याचा खुलासा त्यांनी यावेळी केला. ऑस्ट्रेलियाचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्ध्याला स्लेजिंगसाठी ओळखला जातो. परंतू शास्त्री यांनी या स्लेजिंगचा सामना करण्यासाठी आपल्या संघाला एक खास गुरुमंत्र दिली होता. भारतीय संघाने कसं खेळावं यासाठी माझं चित्र स्पष्ट होतं. तुम्हाला आक्रमक आणि इतरांच्या मनात धडकी भरेल असं खेळायचं आहे, तुमचा फिटनेस कायम राखून खेळायचं आहे, परदेशात जाऊन 20 विकेट घेण्याची क्षमता असलेले बॉलर्स तयार करायचे आहेत. विशेषकरुन ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत असताना तुमचा अॅटीट्यूड तसा असायला हवा. मी खेळाडूंना सांगितलं जर समोरुन तुम्हाला कोणी एक शिवी देत असेल तर तुम्ही तीन शिव्या द्या…दोन तुमच्या भाषेत द्या आणि एक त्यांच्या भाषेत. असा खुलासा शास्त्री यांनी यावेळी केला. इंग्लंड क्रिकेट टीमचे कोच होणार का? गुगली प्रश्नावर रवी शास्त्रींनी दिले थेट उत्तर रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारताने ऑस्ट्रेलियात दोनवेळा कसोटी मालिका जिंकली आहे. ज्यात विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी मोलाची भूमिका बजावली होती. प्रशिक्षणातून निवृत्ती घेतलेले रवी शास्त्री सध्या आयपीएलमध्ये कॉमेंट्री करत आहेत. या मुलाखतीत त्याने इंग्लंडच्या कोचिंगबद्दलही बोलले आहे. यादरम्यान त्याने सांगितले की, मी सात वर्षे टीम इंडियाचा प्रशिक्षक होतो. त्यांना माहित आहे की, या काळात तुम्हाला वर्षातील 300 दिवस कठोर परिश्रम करावे लागतील. इंग्लंड क्रिकेटला सल्ला देताना तो म्हणाला की जो कोणी इंग्लंडचा प्रशिक्षक होईल, त्याने एकदा रूटशी बोलून त्याच्यासोबत भविष्याची तयारी करायला हवी.