JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / केन विल्यम्सनने रचला इतिहास, पाकिस्तानविरुद्ध झळकावलं द्विशतक

केन विल्यम्सनने रचला इतिहास, पाकिस्तानविरुद्ध झळकावलं द्विशतक

पाकिस्तानविरुद्ध कराचीत सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात केन विल्यम्सनने द्विशतक झळकावलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 डिसेंबर : न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यम्सनने पाकिस्तानविरुद्ध कसोटीत द्विशतकी खेळी केली आहे. यासह त्याने न्यूझीलंकडून एक विक्रमही नावावर नोंदवला आहे. न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतकं करणारा तो पहिला क्रिकेटर ठरला आहे. त्याने ब्रेडन मॅक्युलमला मागे टाकलं. केन विल्यम्सनने बऱ्याच काळानंतर शतकी खेळी केली होती. पाकिस्तानविरुद्ध कराचीत सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात केन विल्यम्सनने द्विशतक झळकावलं. विल्यम्सनने 395 चेंडूत 21 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने 200 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये केन विल्यम्सनचं हे पाचवं द्विशतक आहे. न्यूझीलंडसाठी कसोटीत सर्वाधिक द्विशतके करण्याची कामगिरी त्याने केली. याआधी ब्रेडन मॅक्युलमने 4 द्विशतके केली होती. हेही वाचा :  पृथ्वी शॉ निवड समितीवर नाराज, संघ जाहीर होताच DP केला रिमूव्ह अन्…. न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तानला 438 धावांत गुंडाळलं होतं. त्यानंतर सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या सत्रात केन विल्यम्सनचे शतक पूर्ण होताच कर्णधार टीम साउदीने डाव घोषित केला. न्यूझीलंडने 9 बाद 612 धावा केल्या आहेत. त्यांच्याकडे सध्या 174 धावांची आघाडी असून आता पाकिस्तानवर दबाव असणार आहे. हेही वाचा :  ICCच्या क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकन जाहीर, भारताच्या स्टार खेळाडुचा समावेश केन विल्यम्सनला पाकिस्तान विरुद्ध या सामन्यात 21 धावांवर जीवदान मिळालं होतं. यष्टीमागे सरफराज अहमदने यष्टीचित करण्याची सोपी संधी गमावली होती. यामुळे पाकिस्तानचा संघ पिछाडीवर राहिला आणि केन विल्यम्सनने द्विशतक पूर्ण केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या