JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मुंबई इंडियन्सच्या फॅमिलीत आणखी एक टीम, WPLमध्ये MIची 'लेडी पलटन'

मुंबई इंडियन्सच्या फॅमिलीत आणखी एक टीम, WPLमध्ये MIची 'लेडी पलटन'

पहिली वहिली महिला प्रीमियर लीग मार्च २०२३ मध्ये होणार आहे. यासाठी मुंबई इंडियन्सचा एक संघ असणार आहे. मुंबई इंडियन्सचा महिला संघ हा मुंबई इंडियन्स फ्रँचाइजीचा चौथा संघ आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जानेवारी : महिला आयपीएलसंदर्भात आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेताना लीगसाठी पाच फ्रँचाइजींना संघांची विक्री केलीय. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सोशल मीडियावर याबाबतची घोषणा केली. बीसीसीआयने 5 संघ 4669.99 कोटी रुपयांना विक्री केली. महिलांच्या या लीगला वुमन्स प्रीमियर लीग या नावाने ओळखलं जाईल. मुंबई इंडियन्सने महिला आयपीएलमध्ये एक संघ घेतला आहे. पहिली वहिली महिला प्रीमियर लीग मार्च २०२३ मध्ये होणार आहे. यासाठी मुंबई इंडियन्सचा एक संघ असणार आहे. मुंबई इंडियन्सचा महिला संघ हा मुंबई इंडियन्स फ्रँचाइजीचा चौथा संघ आहे. याआधी मुंबई इंडियन्स, मुंबई इंडियन्स केप टाउन आणि मुंबई इंडियन्स एमायरेट्स असे तीन संघ आहेत. हेही वाचा :  तीन वर्षांनी वनडेत शतक केलंस? प्रश्नावर रोहित शर्मा भडकला मुंबई सिटी फ्रँचाइजीसाठीची बोली मुंबई इंडियन्सने जिंकली. आता मुंबई इंडियन्सचा महिला संघही असणार आहे. नवी वुमन्स प्रीमियर लीग ही स्पर्धा फक्त महिला क्रिकेटमध्ये अमुलाग्र बदल करणाराच नव्हे तर इतर महिला खेळाडूंसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. निता अंबानी यांनी म्हटलं की, “मुंबई इंडियन्सच्या वन फॅमिलीमध्ये महिला क्रिकेट संघाचे स्वागत. भारतीय क्रिकेटसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. वुमन्स प्रीमियर लीगमुळे पुन्हा एकदा जागतिक पातळीवर आपल्या मुलींचे कौशल्य, क्षमता आणि त्यांचे गुण प्रकाशझोतात येतील.” निता अंबानी यांनी बीसीसीआयचे या निर्णयासाठी अभिनंदन केलं आहे. मुंबई इंडियन्सची चौथी फ्रँचाइजी असणाऱ्या महिला क्रिकेट संघाचे स्वागत करताना मला आनंद होतोय. क्रिकेटमधील या नव्या बदलासाठी भारत आघाडीवर असल्याचा मला अभिमान आहे. क्रीडा क्षेत्रात महिलांच्या सक्षमीकरणासाठी वुमन्स प्रीमियर लीग महत्त्वाची ठरेल अशी आशा आकाश अंबानी यांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या