mitchell marsh drs
मुंबई, 2 एप्रिल: आयपीएलच्या 15 सीझनमधील रंगलेल्या 45 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने 6 धावांनी दिल्लीवर विजय मिळवला. अखेरच्या षटकापर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात दिल्लीला मिशेल मार्शच्या(Mitchell Marsh) विकेटवेळी झालेली एक चूक चांगलीच महागात पडली. या सामन्यात लखनऊने दिल्लीसमोर (LSG vs DC) 196 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने 13 धावांवरच 2 विकेट्स गमावल्या होत्या, पण असे असले तरी नंतर रिषभ पंत (Rishabh Pant) आणि मिशेल मार्श (Mitchell Marsh) यांनी आक्रमक खेळ करत आक्रमक अर्धशतकी भागीदारी केली. त्यांनी 25 चेंडूतच 60 धावांची भागीदारी केली होती. IPL 2022 : उमरान मलिकच्या वेगापासून कसं संरक्षण कराल?, गावसकरांनी सांगितला सर्वोत्तम उपाय! मात्र, याचवेळी लखनऊचा फिरकीपटू कृष्णप्पा गॉथमने (Krishnappa Gowtham) टाकलेल्या 8 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर मार्शने कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू यष्टीरक्षक क्विंटन डीकॉकच्या हाती गेला. त्यावेळी त्याने विकेटसाठी अपिल केले. मैदानावरील पंचांनीही त्याला बाद दिले, ज्यानंतर मार्श पॅव्हेलियनकडे परतला. त्यानंतर जेव्हा रिप्ले पाहाण्यात आला, तेव्हा स्पष्ट दिसले की, चेंडू बॅटला लागला नव्हता आणि दिल्लीकडे 2 रिव्ह्यू (DRS Review) बाकी होते. त्यामुळे जर मार्शने रिव्ह्यू घेतला असता, तर कदाचीत दिल्लीच्या विजयाची अपेक्षा वाढली असती. अशी चर्चा सध्या क्रिकेट जगतात रंगली आहे.
भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने मार्शला ट्रोल करण्यासाठी एक मजेदार मीम शेअर केला आहे. मुन्ना भाई एमबीबीएस या बॉलीवूड चित्रपटापासून प्रेरणा घेऊन जाफरने रिकी पाँटिंगचाही आपल्या मीममध्ये समावेश केला.
दिल्लीविरुद्धच्या या विजयासोबतच लखनऊ पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. लखनऊने 10 पैकी 7 मॅच जिंकल्या असून 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. लखनऊच्या खात्यात सध्या 14 पॉईंट्स आहेत, त्यामुळे ते प्ले-ऑफच्या आणखी जवळ पोहोचले आहेत. दुसरीकडे दिल्ली 8 पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. दिल्लीने 9 पैकी 4 मॅच जिंकल्या आणि 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.