ishan kishan
मुंबई, 22 एप्रिल: मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI vs CSK) संघात रंगलेल्या या सामन्यात चेन्नईने अखेर 3 विकेट्सने बाजी मारली. या विजयात एमएस धोनी आणि वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी या दोघांचा मोलाचा वाटा राहिला. सामन्यादरम्यान एक असा काही चेंडू टाकला, ज्यापुढे मुंबईचा सलामीवीर गोंधळला असल्याचे पाहायला मिळाले. आयपीएल 2022 मधील (IPL 2022) या 33 व्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 7 विकेट्सच्या नुकसानावर 155 धावा केल्या. या डावादरम्यान चेन्नईकडून मुकेशने (Mukesh Choudhary) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. यामध्ये 15.25 कोटींला विकत घेतलेला फलंदाज इशान किशनचेदेखील नाव आहे. ‘प्लिज माही निवृत्तीतून कमबॅक करं’, टीम इंडियाच्या माजी बॉलरने इंस्टा पोस्ट करत केली मागणी मुकेशने इशानला शून्यावर त्रिफळाचीत (Ishan Kishan Bold On Zero) केले. डावातील पहिल्याच षटकातील पाचवा चेंडू त्याने असा काही टाकला की, इशानला तो चेंडू कळालाच नाही. मुकेशने हा यॉर्कर चेंडू फेकला, ज्याला अडवण्यासाठी इशानने बॅट पुढे केली. परंतु चेंडूच्या वेगामुळे इशानला फटका मारता आला नाही आणि त्याचा तोल जाऊन तो खाली कोसळला. त्यामुळे त्याचा चेंडू थेट स्टंपला धडकला. आणि इशान आऊट झाला.
इशानव्यतिरिक्त रोहितलाही मुकेशने शून्य धावेवर बाद केले. तर ब्रेविसलाही 4 धावांवर पव्हेलियनला धाडले. त्याच्या या सामन्यातील जादुई स्पेलसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुकेशने आयपीएल 2022 मधील लखनऊ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यातून आपले आयपीएल पदार्पण केले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने चेन्नईकडून 6 सामने खेळताना 7 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी, 19 धावांवर 3 विकेट्स इतकी राहिली आहे. त्याने चेन्नईसाठी दीपक चाहरची जागा भरून काढली आहे, जो दुखापतीमुळे या पूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. मुकेशही चाहरप्रमाणे पावरप्लेमध्ये चेन्नईला विकेट्स मिळवून देण्याचे काम करत आहे. एमएस धोनीच्या (MS Dhoni) धमाकेदार बॅटिंगने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला (IPL 2022) विजय हिरावून घेतला आहे. मुंबईने दिलेल्या 156 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला (MI vs CSK) शेवटच्या बॉलला विजयासाठी 4 रनची गरज होती, तेव्हा धोनीने फोर मारून चेन्नईला रोमांचक विजय मिळवून दिला. त्यामुळे क्रिकेट जगतात पुन्हा धोनीच्या फिनीशींगची चर्चा सरु आहे. अशातच टीम इंडियाच्या एका माजी बॉलरने धोनीकडे निव़त्तीतून कमबॅक कर अशी मागणी केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे.