JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Hockey World Cup : भारताची बलाढ्य इंग्लंडशी पडणार गाठ, कोण मारणार बाजी?

Hockey World Cup : भारताची बलाढ्य इंग्लंडशी पडणार गाठ, कोण मारणार बाजी?

आज भारता समोर इंग्लंडच्या संघाचे कडवे आव्हान आहे. यंदाचा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी इंग्लंड संघ देखील तेवढ्याच फॉर्मात असल्याने आजचा भारत विरुद्ध इंग्लंड सामना अधिक रोमांचक होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जानेवारी : सध्या भारतात पुरुष हॉकी क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. 13 जानेवारी पासून या स्पर्धेला सुरुवात झाली, यात तब्बल 16 संघानी सहभाग नोंदवला आहे.  शुक्रवारी भारत विरुद्ध स्पेन यांच्यात पहिली लढत पारपडली असून या सामन्यात स्पेनला भारताने 2-0 ने नमवले. आज भारता समोर  इंग्लंडच्या संघाचे कडवे आव्हान आहे. आजचा सामना जिंकल्यास भारताची बाद फेरी जवळपास निश्चित होणार असून आजचा सामन्यात  कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. यंदाच्या हॉकी वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड संघाने देखील सुरुवाती पासूनच उत्तम कामगिरी केली आहे. शनिवारी वेल्स सोबत झालेल्या सामन्यात इंग्लंडने 5-0 अशी आघाडी मिळवत सामना जिंकला. यंदाचा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी इंग्लंड संघ देखील तेवढ्याच फॉर्मात असल्याने आजचा भारत विरुद्ध इंग्लंड सामना अधिक रोमांचक होण्याची शक्यता आहे. हे ही वाचा : Maharashtra Kesari : शरद पवारांनी केले शिवराज राक्षेचे कौतुक! कधी होणार सामना ? आजचा भारत विरुद्ध इंग्लंड हॉकी सामना बिरसा मुंडा स्टेडियमवर होणार आहे. 21 हजार प्रेक्षक क्षमतेचे हे स्टेडियम असून आज रविवार असल्याने जास्तीत जास्त प्रेक्षक प्रत्यक्ष सामना पाहण्यासाठी हजेरी लावण्याची शक्यता आहे.  सायंकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. कुठे पहाल सामना ? भारत विरुद्ध इंग्लंड हॉकी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण डिझनी हॉट्सस्टार या अँपवर दाखवले जाणार आहे. तसेच स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेल्सवर देखील हा सामना प्रेक्षकांना पाहता येईल. तर फॅन कोडवर हा सामना प्रेक्षकांना फ्री मध्ये पाहता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या