लोकेश राहुल, उपकर्णधार, टीम इंडिया
दुबई, 26 ऑगस्ट**:** आशिया चषक स्पर्धेआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल अनेकदा बोललं गेलं. अनेक आजी-माजी खेळाडूंनी विराटची पाठराखणही केली. विराट आशिया चषकात फॉर्ममध्ये येईल असा अंदाजही अनेकांनी वर्तवलाय. पण विराटच्या याच फॉर्मवरुन आज टीम इंडियाचा उपकर्णधार चांगलाच भडकला. आणि त्यानं विराटच्या फॉर्मवरुन टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले. भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये रविवारी आशिया चषकातला दुसरा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या आधी आज पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला उपकर्णधार राहुल उपस्थित होता. सर्वाचं लक्ष विराटवर आशिया चषकात सध्या विराट कोहलीवरच सर्वांचं लक्ष असेल. कारण विराटनं इंग्लंड दौऱ्यानंतर वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यातून माघार घेतली होती. त्यामुळे तो नव्या दमानं आशिया चषकासाठी सज्ज झालाय. रविवारी होणाऱ्या सामन्यात विराट गेम चेंजर ठरण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. पण पत्रकार परिषदेत जेव्हा विराटच्या फॉर्मविषयी राहुलला विचारण्यात आलं तेव्हा त्यानं आपल्या अंदाजात उत्तर दिलं. राहुल म्हणाला की, ‘आम्ही लोकांच्या म्हणण्याला जास्त महत्व देत नाही. प्रत्येकाचं स्वत:चं असं मत असतं. पण त्यामुळे एखाद्या खेळाडूवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. खासकरुन विराटवर. जे लोग बाहेरुन त्याच्यावर टीका करतात त्याचा त्याच्यावर परिणाम होणार नाही. आणि मला नाही वाटत विराट आऊट ऑफ फॉर्म आहे. तो खरंच खूप चांगला खेळत होता.’ हेही वाचा - Asia Cup 2022: भारत की पाकिस्तान… आशियातली सर्वात यशस्वी टीम कोणती? पाकिस्तानविरुद्ध चांगल्या सुरुवातीची अपेक्षा भारत-पाकिस्तान संघातल्या महामुकाबल्याबाबत राहुलनं आपलं मत मांडलं. तो म्हणाला की ‘दोन्ही संघ आजवर किती वेळा जिंकले-हरले, किंवा किती वेळा खेळले हा सगळा इतिहास आहे. मैदानावर आता आम्हाला शून्यातून सुरुवात करावी लागेल. आणि आम्ही या सामन्यापासून चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करु.’