कोलकात्यात आज दिग्गजांच्यामध्ये महामुकाबला
कोलकाता, 16 सप्टेंबर**:** सिटी ऑफ जॉय अर्थात कोलकात्यात आज क्रिकेटविश्वातले दिग्गज एकत्र येणार आहेत. निमित्त आहे लीजंड्स क्रिकेट लीगचं. कोलकात्यातल्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर लीजंड्स क्रिकेट लीगची सुरुवात एका प्रेक्षणीय सामन्यानं होणार आहे आणि याच सामन्यात भारती दिग्गजांची इंडिया महाराजा आणि वर्ल्ड जायंट्स हे दोन संघ आमनेसामने येणार आहे. या सामन्याच्या निमित्तानं भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवही साजरा केला जाणार आहे. दिग्गजांमध्ये स्पेशल मुकाबला या सामन्यासाठी इंडिया महाराजा सघाचं नेतृत्व टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग करणार आहे. तर वर्ल्ड जायंट्सची धुरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेल्या ऑईन मॉर्गनच्या हाती सोपवण्यात आली आहे. या प्रेक्षणीय सामन्यासह लीजंड्स क्रिकेट लीगमध्ये एकूण 16 सामने खेळवले जाणार आहेत. ज्यात चार संघ सहभागी होणार आहेत. इंडिया कॅपिटल्स – गौतम गंभीर, कर्णधार मणिपाल टायगर्स – हरभजन सिंग, कर्णधार भीलवाडा किंग्स – इरफान पठाण, कर्णधार गुजरात जायंट्स – वीरेंद्र सेहवाग कर्णधार
प्रेक्षणीय सामन्यातून मदत जगातल्या क्रिकेट लीजंड्समध्ये होणाऱ्या आजच्या प्रेक्षणीय सामन्यातून निधी उभारला जाणार आहे. हा निधी भारताचे महान क्रिकेटर कपिल देव यांच्या खुशी फाऊंडेशनला देण्यात येईल. खुशी फाऊंडेशन मुलींच्या शिक्षणासाठी काम करतं. इंडिया महाराजा वि. वर्ल्ड जायंट्स संध्याकाळी 7.30 वा. ईडन गार्डन्स, कोलकाता स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपण
हेही वाचा - Cricket: तो परत आलाय… मुंबईच्या धडाकेबाज बॅट्समनचं टीम इंडियात कमबॅक इंडिया महाराजा संघ**:** वीरेंद्र सेहवाग (कर्णधार), मोहम्मद कैफ, एस बद्रिनाथ, युसूफ पठाण, स्टुअर्ट बिन्नी, जोगिंदर शर्मा, रितेंदर सिंग सोधी, इरफान पठाण, पार्थिव पटेल, नमन ओझा, एस श्रीसंत, हरभजन सिंग, अशोक डिंडा, आरपी सिंह आणि अजय जाडेजा. वर्ल्ड जायंट्स संघ**:** ऑईन मॉर्गन (कर्णधार), लेंडल सिमन्स, हर्शल गिब्ज, जाँटी ऱ्होड्स, असगर अफगाण, जॅक कॅलिस, सनथ जयसूर्या, हॅमिल्टन मासाकाझा, केव्हिन ओब्रायन, नॅथन मॅक्युलम, मॅट प्रायर, दिनेश रामदीन, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, मुशरफी मुर्तझा, मिचेल जॉन्सन.