JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / के एल राहुलचा भाऊ पोहोचला शार्क टॅंकमध्ये; पण नाही करू शकला शार्कला इंप्रेस

के एल राहुलचा भाऊ पोहोचला शार्क टॅंकमध्ये; पण नाही करू शकला शार्कला इंप्रेस

प्रतीक पलानेथ्रा आणि विश्वनाथ हे दोघे शार्क टॅंक या शोवर त्यांच्या बॉलिंग मशीन ब्रँडच्या व्यवसायासाठी फंडिंग मागण्याकरीता आले होते. त्यांनी शो मध्ये येऊन सांगितले की त्यांची अशी एकमेव कंपनी आहे जी अत्यंत कमी किंमतीत बॉलिंग मशीन बनवून देते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जानेवारी : भारताचा स्टार खेळाडू के एल राहुल सध्या चांगल्या फॉर्मात आहे. लवकरच के एल राहुल हा त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री अथिया शेट्टी हिच्याशी लग्न करणार आहे. अशातच के एल राहुलचा चुलत भाऊ सोनी टीव्ही वरील प्रसिद्ध शो ‘शार्क टॅंक’ वर आपल्या बिझनेससाठी फंडिंग मागण्याकरीता आला होता. यावेळी नक्की काय घडले? सविस्तर जाणून घेऊयात. प्रतीक पलानेथ्रा आणि विश्वनाथ हे दोघे शार्क टॅंक या शोवर त्यांच्या बॉलिंग मशीन ब्रँडच्या व्यवसायासाठी फंडिंग मागण्याकरीता आले होते. त्यांनी शो मध्ये येऊन सांगितले की त्यांची अशी एकमेव कंपनी आहे जी अत्यंत कमी किंमतीत बॉलिंग मशीन बनवून देते. त्यांनी आपल्या कंपनीच्या 7.5% इक्विटीसाठी 75 लाखांची मागणी केली होती. परंतु त्यांचे पीच हे सर्व शार्कला फंडिंग देण्यासाठी प्रभावित करू शकले नाही. हे ही वाचा : म्हणून के एल राहुलला IND VS NZ सामन्यातून दिली सुट्टी! ‘या’ दिवशी होणार अथिया शेट्टी आणि के एल राहुलचा विवाह शार्कने बॉलिंग मशीन ब्रँडचे फाउंडर प्रतीक पलानेथ्रा आणि विश्वनाथ यांना त्यांच्या कौटुंबिक पाश्ववभूमी विषयी विचारली असता प्रतीक पलानेथ्रा याने तो भारताचा स्टार क्रिकेटर के एल राहुलचा भाऊ असल्याचे सांगितले. तसेच भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा त्यांच्या कंपनीचा  ब्रँड अॅम्बेसेडर असल्याचेही सांगितले, हे ऐकून सर्व शार्क आश्चर्यचकित झाले.  प्रतीक पलानेथ्रा आणि विश्वनाथ हे दोघे अंडर 16 चे खेळाडू होते तर आता ते क्रिकेटमध्ये अंपायर म्हणून काम करतात. प्रतीक पलानेथ्रा आणि विश्वनाथ या दोघांनी शो दरम्यान त्यांच्या बॉलिंग मशीनचा डेमो देखील दाखवला. तसेच त्यांनी त्यांची कंपनी ही तोट्यात असल्याचे देखील सांगितले. त्यावेळी प्रसिद्ध व्यवसायिक अनुपम मित्तल म्हणाले की, “या उत्पादनाला बाजारात मागणी नाही. मला आश्चर्य वाटले कारण तुम्हाला मार्केटबद्दल माहिती नाही आणि तुम्ही 5 वर्षांपासून मार्केटमध्ये काम करत आहात आणि तुम्ही लोक तोट्यात आहात आणि बाजारात या उत्पादनाची मागणी नाही कारण प्रत्येक टीमकडे त्यांचे स्वतःचे बॉलिंग मशीन असते”. शो वरील प्रसिद्ध व्यावसायिक नमिता थापर हिने बॉलिंग मशीन कंपनीच्या मालकांना 15% इक्विटीसाठी 25 लाख आणि 5% व्याजाने 50 लाख कर्ज देऊ केले.’ तर प्रतीक आणि विश्वनाथ यांनी नमिताला काउंटर ऑफर दिली. तेव्हा नमिता त्यांना म्हणाली, ‘मी तुम्हाला ऑफर देत आहे आणि तुम्ही मला काउंटर देत आहात, इतर शार्क देखील या कंपनीमध्ये कोणताही इंट्रेस्ट दाखवत नाहीत तरी मी दाखवत आहे. त्यानंतर अखेर  प्रतीक आणि विश्वनाथ यांनी नमिताची ऑफर मान्य करून 7.5% इक्विटीसाठी 25 लाखांमध्ये करार केला आणि 50 लाख कर्ज 10 मध्ये % व्याज’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या