जोस बटलर
पर्थ, 9 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपसाठी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंड टी20 मालिका खेळत आहे. याच मालिकेच्या निमित्तानं इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर पुन्हा एकदा मैदानात उतरला. द हन्ड्रेड स्पर्धेत जोस बटलरला दुखापत झाली होती. त्यानंतर पाकिस्तानमध्ये झालेल्या 7 टी20 सामन्यांच्या मालिकेत बटलर एकही सामना खेळला नाही. तरीही इंग्लंडनं ही मालिका 4-3 अशा फरकानं जिंकली. पण ऑस्ट्रेलियात दाखल होताच बटलरनं आपण शंभर टक्के फिट असल्याचं सांगितलं. आणि आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 मॅचमध्ये त्यानं दणक्यात कमबॅक केलं. बटलरची तुफानी इनिंग बटलरनं जवळपास महिन्याभरानंतर मैदानात उतरताच दुखापतीनंतरही आपला फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं. पर्थच्या पहिल्याच टी20 सामन्यात बटलरनं अवघ्या 32 बॉल्समध्ये त्यानं 68 धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीत 8 फोर आणि 4 सिक्सर्सचा समावेश होता.
प्रतिस्पर्धी आमच्यापासून सावध राहतील दरम्यान आजच्या सामन्याआधी बटलरनं एक विधान केलं होतं. त्यानं म्हटलंय की इंग्लंड संघाला तो एक धोकादायक संघ मानतो. ‘प्रतिस्पर्धी संघ इंग्लंडपासून सावध राहील. आमच्याकडे चांगले खेळाडू आणि मॅचविनर खेळाडू आहेत. आणि आणि आम्ही ऑस्ट्रेलियातल्या वर्ल्ड कपमध्ये चांगलं प्रदर्शन करण्यासाठी जात आहोत.’ हेही वाचा - Ind vs SA ODI: लखनौत डेब्यू, रांचीत ड्रॉप; एक मॅच खेळून ‘या’ खेळाडूंना का काढलं? फॅन्सचा सवाल आपल्या फिटनेसबाबतही त्यानं भाष्य केलं होतं… ‘मी आता 100 टक्के फिट आहे. टीममधले काही खेळाडू वर्ल्ड कपच्या आधीपासून सराव करत आहेत. काही दिवसातच वर्ल्ड कप सुरु होईल.’ यानंतर आज बटलरनं 32 बॉल्समध्ये 68 रन्स ठोकून आपण खरंच फिट असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यामुळे आगामी टी20 वर्ल्ड कपमध्येही इतर संघांना बटलरपासून सावध राहण्याची गरज आहे.