इरफानचा पाकिस्तानी पंतप्रधानांना करारा जवाब
मुंबई, 12 नोव्हेंबर: वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून तब्बल 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. त्या पराभवामुळे टीम इंडियाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आणि वर्ल्ड कप जिंकण्याची संधीही हुकली. पण याच पराभवानंतर पाकिस्तानी पंतप्रधानांनी मात्र एक ट्विट करत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्या त्याच ट्विटवर आज टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणणं रिप्लाय करत सडेतोड उत्तर दिलं आहे. काय म्हणाले होते शरीफ? भारताच्या पराभवानंतर शरीफ यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, ‘या रविवारी 152/0 विरुद्ध 170/0 असा सामना होणार होईल.’ एका अर्थानं हा भारताला डिवचण्याचा प्रयत्न होता. कारण गेल्या वर्षी टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्ताननं भारताला दहा विकेट्सनी मात दिली होती आणि 152 धावांचं आव्हान पार केलं होतं. यंदा इंग्लंडनं सेमी फायनलमध्ये बिनबाद 170 धावा करुन भारताचा पराभव केला. त्याचाच आधार घेत शरीफ यांनी खोचक टिप्पणी केली.
इरफान पठाणचं सडेतोड उत्तर दरम्यान आज इरफान पठाणणं पाकिस्तानी पंतप्रधानांच्या या ट्विटचा चांगलाच समाचार घेतला.
पठाणनं त्या ट्विटवर रिप्लाय देत म्हटलंय… ‘तुमच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. आम्ही आमच्या आनंदात आनंद मानतो आणि तुम्हाला दुसऱ्यांना त्रास झाल्याचा आनंद. म्हणून तुमचा देश सुधारण्यावर भर द्या’ अशा शब्दात इरफाननं सडेतोड उत्तर दिलं.