मुंबई, 15 नोव्हेंबर : आयपीएल 2023 साठी सनरायजर्स हैदराबादने मागच्यावर्षीपर्यंत प्रमुख असलेल्या खेळाडूंनाच डच्चू दिला आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमापर्यंत कर्णधार असलेल्या केन विलियमसन याला हैदराबादने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. विलियमसनसह हैदराबादने वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन यालाही डच्चू दिला आहे. हैदराबादने आयपीएल 2023 साठी 12 जणांना रिलीज केलं आहे. हैदराबादने रिलीज केलेले खेळाडू केन विलियमसन, निकोलस पूरन, जगदीशा सुचित, प्रियम गर्ग, रवीकुमार समर्थ, रोमारिया शेफर्ड, सौरभ दुबे, सिन एबॉट, शशांक सिंग, श्रेयस गोपाळ, सुशांत मिश्रा, विष्णू विनोद शिल्लक असलेली रक्कम 42.25 कोटी रुपये हैदराबादने रिटेन केलेले खेळाडू अब्दुल समद, एडन मार्करम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जेनसन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक हैदराबादची टीम लिलावामध्ये जास्तीत जास्त 4 परदेशी खेळाडू विकत घेऊ शकते. रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंनंतर आता 23 डिसेंबरला आयपीएल 2023 साठीचा लिलाव होणार आहे. या लिलावाआधी म्हणजेच 15 नोव्हेंबरला रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला देणं प्रत्येक 10 टीमना बंधनकारक होतं.