JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : पंतच्या अपघातानंतर दिल्ली कॅपिटल्सची धुरा परदेशी खेळाडूच्या खांद्यावर?

IPL 2023 : पंतच्या अपघातानंतर दिल्ली कॅपिटल्सची धुरा परदेशी खेळाडूच्या खांद्यावर?

ऋषभ पंतवर दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधार पदासोबतच विकेटकिपिंगची देखील जबाबदारी होती. तेव्हा दिल्ली संघाला आता नवीन कर्णधारासह विकेटकिपर देखील शोधावा लागणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 जानेवारी : भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत काही दिवसांपूर्वीच कार अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे तो पुढील काही महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहण्याची शक्यता आहे. भारतीय संघांच्या इतर सामन्यांप्रमाणेच पंत 2023 च्या आयपीएलला देखील मुकणार असल्याचे बोलले जात असून पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व कोण करणार याची सध्या चर्चा सुरु आहे. अशातच दिल्ली संघाचं नेतृत्व आता ऑस्ट्रेलियन खेळाडूकडे सोपवले जाणार असल्याचं बोललं जात आहे. आयपीएलच्या दिल्ली संघाचा कर्णधार असलेला ऋषभ पंत जखमी असल्यामुळे IPL 2023 साठी दिल्ली कॅपिटल्सची धुरा ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि सनराईजर्स हैदराबादला आयपीएल जिंकून देणाऱ्या डेव्हिड वॉर्नरकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. वॉर्नरला आयपीएलमध्ये कॅप्टन्सी करण्याचा अनुभव आहे. मात्र हैदराबाद संघाचे वॉर्नरसोबत वाद झाल्यानंतर त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. त्यानंतर वॉर्नरने संघ सोडला होता. दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या इतिहासात आजतागायत एकदाही विजेतेपद पटकावले नाही. तेव्हा डेव्हिड वॉर्नरला दिल्ली संघाचा कर्णधार केल्यास हा निर्णय संघाच्या कामगिरीसाठी लाभदायक ठरू शकतो. हेही वाचा : सिडनी स्टेडियमवर उभारला महिला क्रिकेटरचा पुतळा, सचिनच्या आधी केला होता हा विश्वविक्रम   ऋषभ पंतवर दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधार पदासोबतच विकेटकिपिंगची देखील जबाबदारी होती. तेव्हा दिल्ली संघाला आता नवीन कर्णधारासह विकेटकिपर देखील शोधावा लागणार आहे. यासाठी रणजी ट्रॉफीत कमाल कामगिरी करणाऱ्या सर्फराज खानला विकेटकिपिंगची जबाबदारी सोपवण्यात येईल अशी चर्चा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या