Photo-IPL
मुंबई, 28 मार्च : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) पहिल्या तीन मॅच झाल्या आहेत, या तीन सामन्यांनंतर एक वेगळाच योगायोग समोर आला आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये मॅच फिरवणाऱ्या खेळाडूंचं आडनाव एकच आहे. सीएसके आणि केकेआर (CSK vs KKR) यांच्यातल्या सामन्याने आयपीएलला सुरूवात झाली. पहिल्याच सामन्यात केकेआरने सीएसकेचा 6 विकेटने पराभव केला. 4 ओव्हरमध्ये 20 रन देऊन 2 विकेट घेणाऱ्या उमेश यादवला (Umesh Yadav) मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. आयपीएलचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) यांच्यात झाला. या सामन्यात दिल्लीने मुंबईचा 4 विकेटने पराभव केला. ललित यादवने (Lalit Yadav) 38 बॉलमध्ये नाबाद 48 रन केले, त्याआधी याच सामन्यात कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) फिरकीने मुंबईला 177 रनवर रोखलं. कुलदीपने 4 ओव्हरमध्ये 18 रन देऊन मुंबईच्या 3 विकेट घेतल्या. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) आयपीएलच्या सुरूवातीलाच यादवांनी केलेल्या धमाक्याबाबत एक ट्वीट केलं आहे. आतापर्यंत ही आयपीएल यादवांचीच आहे. पहिले उमेश आणि आता कुलदीप. मेहनत करणाऱ्या या दोघांसाठी खूप आनंदी आहे, असं ट्वीट सेहवागने केलं.
गुजरात-लखनऊ सामन्यात जयंतवर लक्ष आयपीएलमध्ये सोमवारी दोन नव्या टीममध्ये मुकाबला होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात साना होईल. गुजरातच्या टीममध्येही एक यादव, म्हणजेच जयंत यादव आहे.