JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / MI च्या 'बेबी एबी'ची अशी आहे love story, गर्लफ्रेंडने वेधले सर्वांचे लक्ष

MI च्या 'बेबी एबी'ची अशी आहे love story, गर्लफ्रेंडने वेधले सर्वांचे लक्ष

क्रिकेट जगतात ज्यूनियर एबी डिविलियर्स (AB de Villiers) म्हणून ओळख निर्माण झालेला डेवाल्ड ब्रेविसने(dewald brevis) नुकतंच कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या मॅमध्ये पदार्पण केले. सध्या क्रिकेट वर्तुळात त्याच्या खेळीसोबत खासगी आयुष्यावरही चर्चा रंगली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 एप्रिल: क्रिकेट जगतात ज्यूनियर एबी डिविलियर्स (AB de Villiers) म्हणून ओळख निर्माण झालेला डेवाल्ड ब्रेविसने(dewald brevis) नुकतंच कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या मॅमध्ये पदार्पण केले. सध्या क्रिकेट वर्तुळात त्याच्या खेळीसोबत खासगी आयुष्यावरही चर्चा रंगली आहे. बेबी एबीची गर्लफ्रेंड लिंडी मारी ही सध्या चर्चेत आली आहे. लिंडी ही सोशल मीडिया सेंसशन आहे. ती नेहमी फोटो पोस्ट करत असते. गेल्या मागच्या चार वर्षापासून बेबी एबी लिंडला डेट करतोय. दोघे आपल्या इंस्टाग्रामवर रोमँटिक फोटो अपलोड करत सर्वांचे लक्ष वेधत असतात. लिंडचे 13 हजार फॉलोअर्स आहेत. ती खुपच सुंदर दिसते.

बेबी एबीने पदार्पणाच्या मॅचमध्ये 19 बॉलमध्ये 29 धावा केल्या. ब्रेविसने त्याच्या या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार सामील आहेत. ब्रेविस हा एबीडी विलियर्ससारखं बॅटिंग करतो. त्यामुळे तो चर्चेत असतो. जोहान्सबर्ग मध्ये डेवाल्डचा 29 एप्रिल 2003 ला जन्म झाला. ब्रेविसला एक मोठा भाऊ आहे. त्याचे नवा रेनार्ड ब्रेवि असे आहे. एबीडी विलियर्सने दोन वर्ष डेवाल्डला मार्गदर्शन केलं. दोघांनी नेटमध्ये बराच वेळ एकत्र घालवला.

18 वर्षीय डेवाल्डला मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने तीन कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. 20 लाख बेस प्राइस असलेल्या डेवाल्डला विकत घेण्यासाठी सीएसके आणि पंजाब किंग्च यांनी बोली लावली होती. KKR vs DC मॅचपूर्वी ‘मुंबई का शाणा’ बोलताच 2 क्रिकेटपटूंमध्ये राडा, VIDEO डेवाल्डने अंडर 19 स्पर्धेत ऑलराऊंडर खेळाचं प्रदर्शन केलं होत. सहा सामन्यात 84. 33 च्या सरासरीने 506 धावा केल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या