JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : अंपायरच्या एका चुकीमुळे KKR प्ले-ऑफमधून बाहेर! रिंकूच्या विकेटमुळे नवा वाद

IPL 2022 : अंपायरच्या एका चुकीमुळे KKR प्ले-ऑफमधून बाहेर! रिंकूच्या विकेटमुळे नवा वाद

आयपीएल 2022 (IPL 2022) आता अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. प्ले-ऑफमध्ये आतापर्यंत दोन टीम पोहोचल्या आहेत, तर काही टीम या रेसमधून बाहेर झाल्या आहेत. बुधवारी लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्धच्या (KKR vs LSG) सामन्यात पराभव झाल्यानंतर केकेआरचंही प्ले-ऑफचं आव्हान संपुष्टात आलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. प्ले-ऑफमध्ये आतापर्यंत दोन टीम पोहोचल्या आहेत, तर काही टीम या रेसमधून बाहेर झाल्या आहेत. बुधवारी लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्धच्या (KKR vs LSG) सामन्यात पराभव झाल्यानंतर केकेआरचंही प्ले-ऑफचं आव्हान संपुष्टात आलं. केकेआरचा या सामन्यात विजय झाला असता तर केकेआरचं प्ले-ऑफचं आव्हान कायम राहिलं असतं, पण अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा फटका केकेआरला बसल्याचा आरोप चाहते करत आहेत. अंपायरच्या चुकीने बुडवलं केकेआरचं जहाज? आयपीएल 2022 च्या संपूर्ण मोसमात खराब अंपायरिंगवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. केकेआर आणि लखनऊच्या सामन्यातही याची पुनरावृत्ती झाली. फक्त 2 रननी केकेआरचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न भंगलं. रिंकू सिंगने वादळी खेळी करत केकेआरच्या हाताबाहेर वाटत असलेला विजय जवळ आणला, पण मार्कस स्टॉयनिसच्या (Marcus Stoinis) बॉलिंगवर रिंकू (Rinku Singh) आऊट झाला. स्टॉयनिसने टाकलेल्या याच बॉलवरून आता टीका होऊ लागली आहे. रिप्लेमध्ये स्टॉयनिसने टाकलेला बॉल नो बॉल असल्याचा आरोप चाहते करत आहेत.

शेवटच्या ओव्हरमध्ये केकेआरला विजयासाठी 21 रनची गरज होती, तेव्हा रिंकूने पहिल्या चार बॉलवर फोर-सिक्सच्या मदतीने 18 रन ठोकले. शेवटच्या 2 बॉलवर 3 रनची गरज असताना रिंकूने स्टॉयनिसच्या बॉलिंगवर मोठा शॉट मारला, पण एव्हिन लुईसने अफलातून कॅच पकडला आणि केकेआरच्या हातातून मॅच निसटली. लखनऊ या विजयासोबतच प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणारी दुसरी टीम ठरली आहे. त्याआधी गुजरात प्ले-ऑफमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली होती. आता उरलेल्या दोन स्थानांसाठीची रेस रोमांचक झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या