रोहित शर्मा
मोहाली, 19 सप्टेंबर**:** टी20 वर्ल्ड कपआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. टीम इंडियाच्या दृष्टीनं या दोन्ही मालिका महत्वाच्या ठरणार आहेत. दोन्ही मालिकांमध्ये भारतीय संघ एकूण सहा टी20 सामने खेळणार आहेत. संघव्यवस्थापनाला या टीमची चाचपणी करण्यासाठी हे सहा सामने महत्वाचे ठरणार आहेत. या सहा सामन्यांपैकी पहिला सामना उद्या मोहालीत खेळवण्यात येणार आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन निवडणं कर्णधार रोहित शर्मासाठी तितकं सोपं नसणार आहे. रोहितसमोर अनेक पर्याय प्लेईंग इलेव्हन निवडण्यासाठी रोहितसमोर तगडे पर्याय उपलब्ध आहेत. कारण भारतानं आपला टी20 संघच या मालिकेसाठी मैदानात उतरवला आहे. टॉप ऑर्डरमध्ये स्वत: रोहितसह लोकेश राहुल आणि विराट कोहली ही तगडी फळी आहे. तर मिडल ऑर्डरसाठी सूर्यकुमार यादव, रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या असे पर्याय रोहितच्या हाताशी आहेत. रिषभ पंत किंवा दिनेश कार्तिक यापैकी एकाची निवड करायची झाल्यास रोहितसमोर पेच उभा राहील. पण दिनेश कार्तिकला संघात घ्यायचं झाल्यास भारताला चार बॉलरसह खेळावं लागणार आहे. तर हार्दिक पंड्या हा पाचवा ऑप्शन असेल. कोणत्या गोलंदाजाला संधी**?** गोलंदाजीत रोहितच्या हाताशी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. निवडक गोलंदाज संघात घेताना रोहितची कसोटी लागणार आहे. त्यामुळे अंतिम अकरात कोण खेळणार? याबाबत उत्सुकता आहे. भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमरा, युजवेंद्र चहल, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, दीपक चहर आणि उमेश यादव यापैकी रोहित शर्मा आणि भारतीय संघव्यवस्थापन कुणाला संधी देतं हे पाहावं लागले.
मोहाली टी20तली संभाव्य प्लेईंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत/ दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर/हर्षल पटेल, युजवेंद्र चहल