भारत वि. दक्षिण आफ्रिका वन डे
लखनौ, 6 ऑक्टोबर: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातला पहिला वन डे सामना गुरुवारी लखनौमध्ये पार पडला. संजू सॅमसनच्या झुंजार खेळीनंतरही दक्षिण आफ्रिकेनं या सामन्यात 9 धावांनी बाजी मारली. टी20 मालिका गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं लखनौचा सामना जिंकून वन डे मालिकेत मात्र जोरादार सुरुवात केली आहे. टीम इंडियानं हा सामना जिंकलाही असता मात्र सामन्यादरम्यान धवनच्या भारतीय संघाकडून अनेक चुका झाल्या. याचदरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या डावात एक किस्सा घडला ज्यामुळे आता टीम इंडियाच्या खेळाडूंना ट्रोल केलं जात आहे. बॉल बॉयने पकडलं कॅच लखनौ वन डेत भारतीय संघाकडून फिल्डिंगमध्ये अनेक चुका झाल्या. त्यामुळे 40 ओव्हर्सच्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं 249 धावा केल्या. भारतानं या सामन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल 4 कॅच सोडले. त्यामुळे त्याचा मोठा फायदा दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी उचलला. पण याचदरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या डावातल्या 38 व्या ओव्हरमध्ये डेव्हिड मिलरनं मारलेला सिक्स बाऊंड्री लाईनच्या बाहेर एका बॉल बॉयनं कॅच केला. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. आणि त्यानंतर भारतीय फिल्डर ट्रोल झाले. कारण त्याआधी शुभमन गिल, मोहम्मद सिराज, रवी बिश्नोई यांनी कॅच सोडले होते.
हेही वाचा - Ind vs SA ODI: लखनौत टीम इंडिया जिंकली असती, पण विजयाच्या आड आले ‘हे’ प्रमुख अडथळे रविवारी दुसरी लढत दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वन डे मालिकेतला दुसरा सामना रविवारी रांचीमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल.