JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Womens Asia Cup: पाकिस्तानला पुन्हा धूळ चारण्यासाठी भारतीय महिला सज्ज, पाहा भारत-पाक हेड टू हेड रेकॉर्ड

Womens Asia Cup: पाकिस्तानला पुन्हा धूळ चारण्यासाठी भारतीय महिला सज्ज, पाहा भारत-पाक हेड टू हेड रेकॉर्ड

Womens Asia Cup: भारत आणि पाकिस्तानच्या महिला संघांमध्ये आतापर्यंत 20 टी20 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यात तब्बल 10 वेळा भारतानं बाजी मारली आहे. तर केवळ दोन सामने पाकिस्ताननं जिंकले आहे.

जाहिरात

भारत वि. पाकिस्तान महिला एशिया कप सामना

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिल्हेत-बांगलादेश, 7 ऑक्टोबर:  महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत यंदा भारतीय संघानं दणक्यात सुरुवात केली आहे. पहिले तिन्ही सामने जिंकून विजयाची हॅटट्रिक पूर्ण केल्यानंतर आता हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघासमोर आव्हान आहे ते पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं. आज हे दोन्ही संघ आमनेसामने येत आहेत. या सामन्याआधी पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यानं गेल्या काही सामन्यात भारतीय संघानं काही बदल केले होते. पण या सामन्यासाठी पूर्ण तयारीनिशी एक भक्कम संघ भारतानं मैदानात उतरवला आहे. भारतीय संघ - स्मृती मानधना, मेघना, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत, हेमलता, रिचा घोष, दिप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, राधा यादव, रेणुका सिंग, राजेश्वरी गायकवाड भारत-पाकिस्तान हेड टू हेड भारत आणि पाकिस्तानच्या महिला संघांमध्ये आतापर्यंत 20 टी20 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यात तब्बल 10 वेळा भारतानं बाजी मारली आहे. तर  केवळ दोन सामने पाकिस्ताननं जिंकले आहे.

थायलंडकडून पाकिस्तानचा पराभव भारतानं यंदाच्या आशिया कपममध्ये सलग तीन सामने जिंकले आहेत. पण पाकिस्तानला मात्र दुबळ्या थायलंडकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. काल झालेल्या सामन्यात थायलंडनं पाकिस्तानला 4 विकेट्सनी धूळ चारली आणि मोठा धक्का दिला. त्याआधी पाकिस्ताननं श्रीलंका आणि बांगलादेशला हरवलं होतं. त्या सामन्यात थायलंडच्या बॉलर्सनी अचूक मारा करताना पाकिस्तानला 20 ओव्हर्समध्ये 116 रन्समध्येच रोखलं. आणि त्यानंतर झालेल्या रोमहर्षक लढतीत 117 धावांचं टार्गेट थायलंडनं शेवटच्या ओव्हरमध्ये एक बॉल बाकी ठेऊन पार केलं. थायलंडसाठी हा ऐतिहासिक विजय ठरला.

हेही वाचा -  Ind vs SA ODI: लखनौत टीम इंडिया जिंकली असती, पण विजयाच्या आड आले ‘हे’ प्रमुख अडथळे पाकला पुन्हा हरवण्यासाठी टीम इंडिया सज्ज भारतानं गेले तिन्ही सामने मोठ्या फरकानंही जिंकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच आत्मविश्वासानं हरमनप्रीत कौर अँड कंपनी मैदानात उतरेल. दरम्यान हा सामना जिंकल्यास टीम इंडिया सलग चार सामने जिंकून आपलं सेमी फायनलमधलं स्थान पक्कं करेल. दरम्यान याआधी दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं पाकिस्तानी संघाला पराभवाची धूळ चारली होती. त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या