अँटिगुआ, 25 ऑगस्ट : भारतानं वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी आपली पकड मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात 3 बाद 185 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांची अर्धशतके झाली असून दोघेही खेळत आहेत. सध्या भारताकडे 260 धावांची आघाडी आहे. दरम्यान, पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही भारताचे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. चहापानापर्यंत भारताने 98 धावांत तीन गडी गमावले होते. त्यानंतर कर्णधार कोहली आणि रहाणे यांनी शतकी भागिदारी केली. मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा पुन्हा अपयशी ठरले. तर केएल राहुलसुद्धा लवकर बाद झाला. त्यामुळं पहिल्या डावा प्रमाणे भारताची अवस्था 3 बाद 81 अशी झाली होती. मात्र या सामन्यात केएल राहुलची एक चूक भारताला आणि मयंक अग्रवालला महागात पडली. भारतीय गोलंदाजांच्या शानदार खेळीमुळं वेस्ट इंडिजचा पहिल्या डावात 222 धावांवर गुंडाळला. त्यामुळं भारताला 75 धावांची आघाडी मिळाली होती. दरम्यान भारताच्या दुसऱ्या डावांत फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियानं 14व्या ओव्हरमध्येच पहिली विकेट गमावली. मयंक अग्रवालला रोस्टन चेसनं बाद केले. चेसच्या दुसऱ्या चेंडूवर मैदानावरील पंचांनी मयंक अग्रवालला बाद केले. यावर मयंकनं नाराजी दर्शवत केएल राहुलकडे रिव्ह्यु मागण्याबाबत चर्चा केली. मात्र केएल राहुलनं रिव्ह्यु मागण्यास सक्त नकार दिला, त्यामुळं त्याला मैदानाबाहेर पडावे लागले.
दरम्यान रिप्लेमध्ये वेगळेच चित्र दिसले, चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर होता, त्यामुळं मयंकनं रिव्ह्यु घेतला असता तर, तो नॉट आऊट राहिल असता. सलामीला आलेला मयंक केवळ 16 धावा करत बाद झाला. यानंतर केएल राहुलवर ट्विरवर जोरदार टीका झाली. वाचा- IND vs WI, 1st Test, Day 3 : कोहली-रहाणेची जोडी जमली, भारताकडे 260 धावांची आघाडी
वाचा- …म्हणून अश्विनला संघात जागा नाही, हरभजन सिंगनं सांगितलं खरं कारण पहिल्या डावात भारताने विंडीजला 222 धावांत गुंडाळलं. पहिल्या डावात भारताला 75 धावांची आघाडी मिळाली होती. इशांत शर्माने 5 तर मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहला एक विकेट मिळाली. विंडीजच्या होल्डर आणि कमिन्स यांन्या नवव्या गड्यासाठी 41 धावांची भागिदारी करून संघाला 200 धावांचा टप्पा गाठू दिला. जेसन होल्डरने 65 चेंडूत पाच चौकारांसह 39 धावा केल्या. वाचा- लॅबुशेनचा खास विक्रम, कसोटीच्या 142 वर्षांच्या इतिहासातील पाचवा फलंदाज उलट्या काळजाचा! कुत्राला बेदम मारहाण करतानाचा VIDEO केला शूट