अँटिगुआ, 25 ऑगस्ट : भारतानं वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी आपली पकड मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात 3 बाद 185 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांची अर्धशतके झाली असून दोघेही खेळत आहेत. सध्या भारताकडे 260 धावांची आघाडी आहे. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही भारताचे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. चहापानापर्यंत भारताने 98 धावांत तीन गडी गमावले होते. त्यानंतर कर्णधार कोहली आणि रहाणे यांनी शतकी भागिदारी केली. मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा पुन्हा अपयशी ठरले. तर केएल राहुलसुद्धा लवकर बाद झाला. भारताची अवस्था 3 बाद 81 अशी झाली होती. विंडीजच्या रोस्टन चेजनं 42 धावांत 2 गडी बाद केले.
दरम्यान, भारताने विंडीजला पहिल्या डावात 222 धावांत गुंडाळलं. पहिल्या डावात भारताला 75 धावांची आघाडी मिळाली होती. इशांत शर्माने 5 तर मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहला एक विकेट मिळाली. विंडीजच्या होल्डर आणि कमिन्स यांन्या नवव्या गड्यासाठी 41 धावांची भागिदारी करून संघाला 200 धावांचा टप्पा गाठू दिला. जेसन होल्डरने 65 चेंडूत पाच चौकारांसह 39 धावा केल्या. SPECIAL REPORT : पवारांची साथ सोडून उदयनराजे खरंच जातील का भाजपात?

)







