लॅबुशेनचा खास विक्रम, कसोटीच्या 142 वर्षांच्या इतिहासातील पाचवा फलंदाज

लॅबुशेनचा खास विक्रम, कसोटीच्या 142 वर्षांच्या इतिहासातील पाचवा फलंदाज

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकला असून त्याच्या जागी खेळणाऱ्या मार्नस लॅबुशेनने इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात 74 आणि दुसऱ्या डावात 80 धावांची खेळी केली.

  • Share this:

लीड्स, 25 ऑगस्ट : अशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात जो रूटच्या नाबाद 75 धावांच्या खेळीमुळं इंग्लंडचा डाव सावरला. पहिल्या डावात इंग्लंडचा संघ 67 धावांत गुंडाळल्यानंतर तिसऱ्या दिवशीच विजय मिळवण्याच्या इराद्यानं ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरला होता. मात्र इंग्लंडने तिसऱ्या दिवस अखेर तीन बाद 156 धावा केल्या. त्यांना विजयासाठी 203 धावांची गरज आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुशेननं इंग्लंडविरुद्ध अॅशेस कसोटी मालिकेत 80 धावांची खेळी करून अनोखा विक्रम केला आहे. दोन्ही डावात विरोधी संघाच्या एका डावातील एकूण धावसंख्येपेक्षा जास्त धावा करण्याची कामगिरी लॅबुशेननं केलं आहे. त्यानं पहिल्या डावात 74 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात 80 धावांची खेळी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली होती. इंग्लंडचा पहिला डाव 67 धावांत संपुष्टात आला होता. अॅशेसच्या 71 वर्षांच्या इतिहासातील ही इंग्लंडची सर्वात निच्चांकी कामगिरी आहे.

प्रतिस्पर्धी संघाच्या एका डावापेक्षा जास्त धावा दोन्ही डावात करण्याची कामगिरी करणारा लॅबुशेन जगातील पाचवा तर ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज आहे. यामध्ये जस्टीन लँगर, डॉन ब्रॅडमन, गार्डन ग्रीनिज आणि मॅथ्यू हेडन यांचा समावेश आहे. ब्रॅडमन यांनी भारताविरुद्ध 1948 मध्ये 132 आणि 127 धावांची खेळी केली होती. तर भारतीय संघ 125 धावांवर बाद झाला होता.

विंडीजचे दिग्गज फलंदाज ग्रीनिज यांनी इंग्लंडविरुद्ध 1976 मध्ये 134 आणि 101 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा संघ तेव्हा 71 धावांवर बाद झाला होता. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध 197 आणि 103 धावांची खेळी केली होती. तेव्हा इंग्लंडला एका डावात 79 धावाच करता आल्या होत्या. जस्टीन लँगर यांनी पाकिस्तानविरुद्ध 191 आणि 97 धावांची खेळी केली होती. तर पाकचा संघ 72 धावांत गुंडाळला होता.

SPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन होणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2019 10:56 AM IST

ताज्या बातम्या