JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / विक्रमांचा ‘विराट’ बादशाह! गांगुलीसह अनेक विक्रमवीरांना टाकले मागे

विक्रमांचा ‘विराट’ बादशाह! गांगुलीसह अनेक विक्रमवीरांना टाकले मागे

वेस्ट इंडिज विरोधात 120 धावांची शतकी खेळी करत त्यानं अनेक विक्रमांना गवसणी घातली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

त्रिनिदाद, 11 ऑगस्ट : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीनं आक्रमक खेळी केली. वेस्ट इंडिज विरोधात 120 धावांची शतकी खेळी करत त्यानं अनेक विक्रमांना गवसणी घातली. विराटचे हे 42वे शतक आहे. या सामन्यात विराटनं सर्वात जास्त एकदिवसीय धावा करत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलाची विक्रम मोडला आहे. सर्वात जास्त धावा करत गांगुलीला टाकले मागे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट आता आठव्या क्रमांकावर आहे. त्यानं 11 हजार 363 धावा करणाऱ्या सौरव गांगुलीला मागे टाकले. कोहलीनं 238 सामन्यात 59.71च्या सरासरीनं 11 हजार 406 धावा केल्या आहेत. तर, सगळ्यात जास्त धावा करण्याता विक्रमही अजूनही सचिनच्या नावावर आहे. सचिननं 463 सामन्यात 18 हजार 426 धावा केल्या होत्या. सगळ्यात जास्त शतक लगावणारा कर्णधार एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्या तरी संघाविरोधात सर्वात जास्त शतक करण्याती कामगिरी विराटनं केली आहे. विराटनं वेस्ट इंडिज विरोधात कर्णधारपदी असताना 6 शतक लगावण्याती कामगिरी केली आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग यांनं न्यूझीलंड विरोधात सर्वात जास्त 5 शतक लगावले होते. तर, सचिन तेंडुलकरच्या नावावर संघाविरोधात सर्वात जास्त शतक ठोकण्याचा विक्रम आहे. सचिननं ऑस्‍ट्रेलियाविरोधात 9 शतक लगावले आहेत. तर, श्रीलंके विरोधात 8 शतक. कोहलीनं श्रीलंका, ऑस्‍ट्रेलिया आणि वेस्‍ट इंडीज विरोधात प्रत्येकी 8 शतक लगावले आहेत. 2000 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड शतकी पारी करत विराटनं 34 डावांत वेस्ट इंडिज विरोधात 2 हजार धावा पूर्ण केल्या. हा एक अनोखा रेकॉर्ड आहे. विराट कोहली सर्वात कमी डावांमध्ये 2 हजार धावा करणारा खेळाडू झाला आहे. याआधी रोहित शर्मानं ऑस्ट्रेलिया विरोधात 37 डावांमध्ये 2 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यामुळं त्यानं रोहितला मागे टाकले. वाचा- रोहित-विराटनं टीकाकारांना दिले चोख उत्तर, मोडला सर्वात मोठा विक्रम! विराटनं मोडला जावेद मियाँदादचा विक्रम भारत-वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीनं 26 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. कर्णधार कोहलीनं वेस्ट इंडिज विरोधात फलंदाजी करताना 20 धावा करत पाकिस्तानच्या दिग्गज फलंदाजाचा विक्रम मोडला. विराटनं पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांचा विक्रम मागे टाकला आहे. पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी 1993 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. मियाँदाद यांनी विंडीजविरुद्ध 64 डावात 1930 धावा केल्या होत्या. विराटनं फलंदाजी करताना केवळ 19 धावा करत 34 डावांमध्ये मियॉंदाद यांचा हा विक्रम मोडला. विराटच्या या खेळीत सात शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. वाचा- धोनीच्या घरी आला नवा पाहूणा! साक्षी करतेय माहीला मिस एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा असणारे फलंदाज सचिन तेंडुलकर - 18426 कुमार संगकारा - 14234 रिकी पॉटिंग - 13704 सनथ जयसूर्या - 13430 महेला जयवर्धने - 12650 इंजमाम उल-हक - 11739 जॅक कॅलिस - 11579 विराट कोहली - 11406 सौरव गांगुली - 11363 वाचा- विराटच्या शेरपेचात आणखी एक मानाचा तुरा, पाक खेळाडूला टाकले मागे! Special Report : कडक सॅल्युट! पुरात अडकलेल्यांसाठी देवदूत ठरलेल्या वर्दीतल्या ‘बाप’ माणसांचा VIDEO पाहून ऊर येईल भरून

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या