त्रिनिदाद, 11 ऑगस्ट : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीनं 26 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. कर्णधार कोहलीनं वेस्ट इंडिज विरोधात फलंदाजी करताना 20 धावा करत पाकिस्तानच्या दिग्गज फलंदाजाचा विक्रम मोडला. विराटनं पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांचा विक्रम मागे टाकला आहे. पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी 1993 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. मियाँदाद यांनी विंडीजविरुद्ध 64 डावात 1930 धावा केल्या होत्या. विराटनं फलंदाजी करताना केवळ 19 धावा करत 34 डावांमध्ये मियॉंदाद यांचा हा विक्रम मोडला. विराटच्या या खेळीत सात शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. या तुलनेत मियाँदाद यांनी फक्त एक शतक आणि 12 अर्धशतकं केली आहेत.
दुसऱ्या सामन्यात भारतानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतानं संघात कोणतेही बदल केले नाहीत. मात्र, सलामीच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. शिखर धवन केवळ 2 धावांवर बाद झाला. पहिल्याच ओव्हरमध्ये शेल्डन कॉटलरनं शिखरला बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराटनं 14व्या ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी करत आपलं अर्धशतकी खेळी पूर्ण केली, विराटचे हे 55वे अर्धशतक आहे. विराट आणि रोहितनं 74 धावांची भागिदारी केली, मात्र रोहितला 34 चेंडूत फक्त 18 धावा करता आल्या. चौथ्या क्रमांकाचा प्रश्न कायम दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऋषभ पंतला केवळ 20 धावा करता आल्या. त्यामुळं भारताच्या चौथ्या क्रमांकाचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. पंतला ब्रेथवेटनं क्लीन बोल्ड केले. दरम्यान, वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या टी-20 सामन्यात पहिल्या दोन सामन्यात पंत अपयशी ठरला होता. त्याला दोन सामन्यात 0 आणि 4 धावात काढता आल्या होत्या. चौथ्या क्रमांकासाठी संघात घेतलेल्या ऋषभला एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. VIDEO : ‘त्या’ बचावामागची खरी कहाणी; ‘तो’ माणूस 3 दिवस तराफ्यावर होता बसून