JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / टीम इंडिया अनोख्या पद्धतीने वाहणार अरुण जेटली यांना श्रद्धांजली!

टीम इंडिया अनोख्या पद्धतीने वाहणार अरुण जेटली यांना श्रद्धांजली!

जेटली 1999 ते 2013 पर्यंत दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यामुळं क्रिकेट आणि त्यांचा खुप जवळचा संबंध होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अँटिगुआ, 24 ऑगस्ट : प्रदीर्घ काळापासून आजारी असलेले अरुण जेटली यांनी आज अखेरचा श्वास घेतला. दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी आपले प्राण सोडले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना तीन आठवड्यांपूर्वी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान बीसीसीआयनं अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त करत, त्यांना ‘असधारण नेता’ असा सन्मान दिला आहे. राजकारणाबरोबरच अरूण जेटली यांचे खेळासोबतही खुप जवळचे संबंध होते. जेटली 1999 ते 2013 पर्यंत दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यामुळं क्रिकेट आणि त्यांचा खुप जवळचा संबंध होता. बीसीसीआयनं आपल्या पत्रात, “जेटली एक असधारण नेता आहेत. त्यांनी नेहमी क्रिकेटच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले आहे. एक प्रशंसकच्या रूपात नेहमीच आम्ही त्यांनी आठवण काढू. त्यामुळं आज अँटिगुआ येथे सुरु असलेल्या भारत-वेस्ट इंडिज कसोटी सामन्यात भारतीय संघ हाताला काळ्या फिती बांधून मैदानात उतरतील”, असे म्हटले आहे.

संबंधित बातम्या

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय संघातील खेळाडू पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी हातात काळ्या फिती बांधून मैदानात उतरतील. दरम्यान या सामन्यात इशांत शर्मानं घातक गोलंदाजी तर पाच विकेट घेतल्या. त्यामुळं वेस्ट इंडिजला 8 विकेट गमावत केवळ 189 धावा करता आल्या. वेस्ट इंडिज भारतानं पहिल्या डावात केलेल्या 297 धावांच्या 108 धावांनी मागे आहे. वाचा- अश्विनला किंग्ज इलेव्हन पंजाब देणार डच्चू? ‘या’ खेळाडूकडे जाणार कर्णधारपद अरुण जेटली आणि क्रिकेट यांचे संबंध अरुण जेटली जवळजवळ 13 वर्ष दिल्ली क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष होते. त्यांनी 1999 ते 2012मध्ये डीडीसीएसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळांडूनसाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, शिखर धवन आणि इशांत शर्मा यांनी दिल्लीतून खेळण्यास सुरुवात केली. वाचा- शटल क्वीनची दमदार खेळी! सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये एण्ट्री सेहवाग म्हणतो जेटलींमुळं क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली अरुण जेटलींमुळं माझ्यासारख्या खेळाडूंना भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली. त्यांनी नेहमीच खेळाडूंचे म्हणणे एकून घेतले. त्रास असेल तर तो सोडवण्याचा प्रयत्न केला. माझे त्यांच्या सोबत खुप चांगले संबंध होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. वाचा- ‘या’ एका कारणामुळं सेहवागसाठी अरुण जेटली ठरले हिरो! गौतम गंभीरही झाला भावूक निधनानंतर सोशल मीडियावर अनेकांनी दु:ख व्यक्त केले. यात भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं ट्विटरवरून दु:ख व्यक्त केले. गंभीरनं, “वडिल तुम्हाला बोलायला शिकवतात, मात्र तुमच्या आयुष्यात जी व्यक्त पित्या समान असते ती तुम्हाला जीवनाच कसे वागायचे हे शिकवते. वडिल तुम्हाला नाव देतात, पण पित्या समान व्यक्ती तुम्हाला ओळख देतात. आज मी माझ्या पित्या समान व्यक्तीला गमावले. माझ्या शरीरातील एक भाग आज निखळला. सर, तुमच्या आत्म्यास शांती लाभो’, असे ट्वीट केले. वाचा- ‘मी माझा बाप गमावला’, अरुण जेटलींच्या निधनानंतर भारतीय क्रिकेटरला भावना अनावर अखेर मनसे सैनिकांनी फोडलीच EVM ची हंडी, पाहा हा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या