JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND Vs SL : दुसरा टी20 सामना आज, घरच्या मैदानावर दोन पुणेकरांना संधी?

IND Vs SL : दुसरा टी20 सामना आज, घरच्या मैदानावर दोन पुणेकरांना संधी?

भारत श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यादरम्यान भारताचा स्टार खेळाडू संजू सॅमसनला दुखापत झाली होती. आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात पुण्याचा ऋतुराज गायकवाड किंवा राहुल त्रिपाठी यांना भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील मंगळवारी झालेला पहिला टी 20 सामना भारताने जिंकून मालिकेत1-0 अशी आघाडी घेतली होती. अशातच आज पुन्हा एकदा भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा टी 20 सामना पुण्यात पार पडणार आहे. आजचा सामान जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्यास भारतीय संघ उत्सुक असून दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी दोन पुणेकर खेळाडूंमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. भारत श्रीलंका यांच्यात 3 जानेवारी रोजी झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यादरम्यान भारताचा स्टार खेळाडू संजू सॅमसनला दुखापत झाली होती. त्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत माहिती समोर आली नसली तरी संजू सॅमसन तंदुरुस्त नसल्यास भारतीय संघात बदल होणार आहेत. आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात संघात संजू सॅमसनला स्थान न मिळाल्यास पुण्याचा ऋतुराज गायकवाड किंवा राहुल त्रिपाठी यांना भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पुणेकर खेळाडू असलेले राहुल आणि ऋतुराज पुण्याच्या मैदानावर कमाल करू शकतात. काहीच दिवसांपूर्वी ऋतुराज गायकवाड याने विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये उत्तर प्रदेश संघा विरुद्ध जबरदस्त बॅटिंग करून एका ओव्हरमध्ये 7 षटकार मारण्याचा विक्रम केला होता. आयपीएलमध्ये देखील ऋतुराज गायकवाडची कामगिरी ही उल्लेखनीय आहे. तर दुसऱ्या बाजूला राहुल त्रिपाठी याचाही क्रिकेटमधील ट्रॅक रेकॉर्ड उत्तम आहे. अशातच दोन्ही पैकी कोणालाही संधी मिळाल्यास भारतीय संघाला मदतच होईल. परंतु एका पुणेकरासाठी दुसऱ्या पुणेकराच हृदय तुटणार आहे. हेही वाचा :  बुमराह इज बॅक! टीम इंडियासाठी गूड न्यूज, श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी संघ जाहीर आज पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना सायंकाळी 7 वाजता सुरु होणार असून यापूर्वी अर्धातास अगोदर नाणेफेक होईल. यावेळी भारतीय संघाचा घातक गोलंदाज अर्शदीप सिंह संघात परतणार असल्याने भारतीय संघाची बाजू अधिक भक्कम हॊईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या