JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Asia Cup: सोमवारपासून मिळणार भारत-पाक सामन्याची तिकिटं, पाहा किती आहे एका तिकिटाची किंमत?

Asia Cup: सोमवारपासून मिळणार भारत-पाक सामन्याची तिकिटं, पाहा किती आहे एका तिकिटाची किंमत?

Asia Cup: एसीएनं काल एक ट्विट करत 15 ऑगस्टपासून आशिया चषकातील सामन्यांची तिकिटं बुक करता येणार असल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर ज्या वेबसाईटवरुन ही तिकिटं काढता येणार आहेत त्याची लिंकही देण्यात आली आहे. इतर सामन्यांच्या तुलनेत भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांचे भाव जास्त असणार आहेत.

जाहिरात

बाबर आझम, रोहित शर्मा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 14 ऑगस्ट**:**  आशिया चषकाचं बिगुल वाजण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. आशियातले अव्वल सहा संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पण सर्वांची नजर राहील ती पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधल्या लढतीवर. 28 ऑगस्टच्या संध्याकाळी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या तिकिटांसाठी दोन्ही देशांच्या चाहत्यांकडून मोठी मागणी आहे. पण अजून आशियाई क्रिकेट काऊन्सिल अर्थात एसीएनं सामन्याची तिकीटं विक्रीस उपलब्ध केलेली नाहीत. पण काल एसीएनं ट्विट करत ही तिकीटं कधी उपलब्ध होणार याची माहिती दिली आहे. सोमवारपासून चाहत्यांना मिळणार तिकिटं एसीएनं काल एक ट्विट करत 15 ऑगस्टपासून आशिया चषकातील सामन्यांची तिकिटं बुक करता येणार असल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर ज्या वेबसाईटवरुन ही तिकिटं काढता येणार आहेत त्याची लिंकही देण्यात आली आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान आधीच पात्र ठरले आहेत. पण सहाव्या जागेसाठी पात्रता फेरीचे सामने 20 ऑगस्टपासून होणार आहेत. या सहाव्या जागेसाठी यूएई, कुवेत, सिंगापूर आणि हाँगकाँग यांच्यात चुरस आहे.

संबंधित बातम्या

किती असेल तिकिटाची किंमत**?** आशिया चषका सामन्यांच्या तिकिटांची किंमत ही दुबई आणि शारजाहमध्ये वेगवेगळी असणार आहे. दुबईतल्या सामन्याचं कमीत कमी तिकीट 75 दिरहॅम इतकं असेल. ज्याची भारतीय रुपयातली किंमत 1625 इतकी आहे. तर हेच तिकीट शारजामध्ये मात्र 35 दिरहॅम म्हणजेच जवळपास 750 रुपयांना मिळेल. पण भारत पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची किंमत सर्वात जास्त आहे. उभय संघातल्या 28 ऑगस्टच्या सामन्याचं कमीत कमी तिकीट 4 हजार 300 रु. इतकं आहे. तर जास्तीत जास्त किंमत 21 हजार रुपयांपेक्षाही जास्त असेल हेही वाचा - Sachin Tendulkar: गोष्ट सचिनच्या पहिल्यावहिल्या शतकाची, पाहा 32 वर्षांपूर्वी मॅन्चेस्टरमध्ये नेमकं काय घडलं होतं? आशिया चषक स्पर्धेचं वेळापत्रक ग्रुप ए : भारत विरुद्ध पाकिस्तान : 28 ऑगस्ट, दुबई भारत विरुद्ध क्वालिफायर : 31 ऑगस्ट, दुबई पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर : 2 सप्टेंबर, शारजाह ग्रुप बी श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान : 27 ऑगस्ट, दुबई बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान : 30 ऑगस्ट, शारजाह श्रीलंका विरुद्ध बांगलादेश : 1 सप्टेंबर, दुबई सुपर-4 B1 v B2: 3 सप्टेंबर, शारजाह A1 v A2: 4 सप्टेंबर, दुबई A1 v B1: 6 सप्टेंबर, दुबई A2 v B2: 7 सप्टेंबर, दुबई A1 v B2: 8 सप्टेंबर, दुबई B1 v A2: 9 सप्टेंबर, दुबई फायनल : 11 सप्टेंबर, दुबई

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या