ms dhoni and sakshi dhoni
रांची, 27 जानेवारी : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी२० सामना झाला. न्यूझीलंडने हा सामना २१ धावांनी जिंकून ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. रांचीत झालेल्या या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी स्टेडियममध्ये उपस्थित होता. प्रेक्षकांनीही हा सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, सामन्यावेळी स्क्रीनवर जेव्हा धोनी दिसला तेव्हा चाहत्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. महेंद्रसिंह धोनी पत्नी साक्षीसोबत सामना पाहण्यासाठी आला होता. सामन्याच्या आदल्यादिवशी त्याने स्टेडियममध्ये येऊन खेळाडूंसोबत ड्रेसिंगरुममध्ये संवाद साधला होता. त्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. बीसीसीआयने धोनीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसतं की धोनीवर जेव्हा कॅमेरा जातो तेव्हा प्रेक्षक त्याचे नाव घेत जोर जोरात ओरडतात. यावेळी धोनीही प्रेक्षकांच्या दिशेने हात हलवून त्यांचे आभार मानतो. धोनीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट अन् लाइक्सचा पाऊस पाडला आहे.
हेही वाचा : IND vs NZ : वॉशिंग्टनचा ‘सुंदर’ खेळ, पण न्यूझीलंडने मारली बाजी; भारताचा पराभव धोनीने सामन्याच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाच्या खेळाडूंना सरप्राइज दिलं होतं. धोनी स्वत: स्टेडियममध्ये पोहोचला होता आणि त्याने खेळाडूंची भेट घेतली होती. बीसीसीआयने धोनी आणि खेळाडूंचा ड्रेसिंग रूममधला व्हिडीओ शेअऱ करत म्हटलं होतं की, ‘रांचीत ट्रेनिंगवेळी कोण भेटायला आलंय पाहा.. एम एस धोनी’ भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून २०२० मध्ये निवृत्ती घेतली होती. त्यानंतर आता तो फक्त आय़पीएलमध्ये खेळताना दिसतो.