JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पाच वर्षात फक्त 8 कसोटीत संधी, कुलदीपचे 22 महिन्यांनी पुनरागमन अन् केला विक्रम

पाच वर्षात फक्त 8 कसोटीत संधी, कुलदीपचे 22 महिन्यांनी पुनरागमन अन् केला विक्रम

कुलदीप यादवने भारताकडून अखेरचा कसोटी सामना 2021 मध्ये खेळला होता. त्यानतंर 22 महिन्यांनी त्याला बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेतून पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 डिसेंबर : तब्बल 22 महिन्यांनी कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या कुलदीप यादवने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत फलंदाजीसह गोलंदाजीतही कमाल केली आहे. पदार्पण केल्यानंतर पाच वर्षात त्याला फक्त 8 कसोटीत संधी मिळाली आहे. त्याने जवळपास दोन वर्षांनी पुनरागमन केलं आहे. बांगलादेशविरुद्ध भारतीय फिरकीपटूची सर्वोत्तम कामगिरी त्याने नोंदवली. कुलदीपने पहिल्या डावात त्याच्या कारकिर्दीत एका डावात सर्वाधिक 40 धावा केल्या. त्यानंतर 40 धावात 5 गडी बाद केले. कुलदीपच्या 5 विकेटच्या जोरावर भारताने बांगलादेशला पहिल्या डावात फक्त 150 धावात गुंडाळलं. कुलदीपने इबादतला बाद करत आपल्या कसोटी कारकिर्दीत तिसऱ्यांदा एका डावात पाच गडी बाद करण्याची कामगिरी केली. कुलदीप यादव 22 महिन्यानंतर कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. यात त्याने सर्वोत्तम अशी कामगिरी करताना 40 धावा देत पाच गडी बाद केल्या. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 55.5 षटकेच खेळू शकला. हेही वाचा :  IND vs BAN Test : गिल आणि पुजाराचे शतक, भारताचा बांगलादेशसमोर धावांचा डोंगर

कुलदीप यादवने भारताकडून अखेरचा कसोटी सामना 2021 मध्ये खेळला होता. त्यानतंर 22 महिन्यांनी त्याला बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेतून पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. यात त्यानं दमदार कामगिरी करताना 5 गडी बाद केले. याआधी त्याने ऑस्ट्रेलियात आणि वेस्ट इंडिजविरुद्ध भारतात एका डावात पाच विकेट घेतल्या होत्या. ही कुलदीप यादवच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी होती.

कुलदीप यादवने रविचंद्रन अश्विन आणि अनिल कुंबळे यांना मागे टाकत बांगलादेशमध्ये भारताच्या फिरकीपटूकडून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा विक्रम नावावर केला. याआधी हा विक्रम अश्विनच्या नावावर होता. त्याने 2015 मध्ये फतुल्लाहमध्ये 87 धावात 5 गडी बाद केले होते. तर अनिल कुंबळेने 2004 मध्ये बांगलादेशविरुद्ध याच मैदानावर 55 धावात 4 गडी बाद केले. कुलदीपच्या आधी अश्विन आणि सुनील जोशी यांना कसोटी क्रिकेटमध्ये पाच गडी बाद करण्यात यश मिळालं आहे. भारताकडून बांगलादेशमध्ये सर्वोत्तम कामगिरीची नोंद जहीर खानच्या नावावर असून त्याने 2007 मध्ये 87 धावात 7 गडी बाद केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या