मुंबई, 16 डिसेंबर : भारताने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा डाव २५८ धावांवर घोषित केला. चेतेश्वर पुजाराने नाबाद 102 धावा केल्या तर शुभमन गिल 110 धावावंर बाद झाला. जवळपास चार वर्षांनी चेतेश्वर पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये शतक केलं आहे. याआधी त्याने जानेवारी 2019 मध्ये शतक केलं होतं. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 404 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल पहिल्या डावात बांगलादेशला 150 धावाच केल्या. यामुळे भारताला 254 धावांची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावात भारताने 258 धावांवर डाव घोषित केला असून बांगलादेशला विजयासाठी 513 धावांचे आव्हान दिले आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने बिनबाद 41 धावा केल्या आहेत. झाकिर हसन 19 धावांवर तर नजमुल हुसैन 22 धावांवर खेळत आहेत. चौथ्या दिवशी भारताला सामना जिंकण्याच्या आशा आहेत. हेही वाचा : द्विशतकानंतर इशानसोबत वडील बोलले नाही, काय आहे कारण?
भारताचा युवा खेळाडू शुभमन गिलने 110 धावांची खेळी करत कसोटी कारकिर्दीतलं पहिलं शतक झळकावलं. शतकानंतर त्याला फार काळ मैदानावर टिकून राहता आलं नाही. शुभमन गिल मेहदी हसनच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने 152 चेंडूचा सामना करत 10 चौकार आणि 3 षटकारासह 110 धावा केल्या.
तत्पूर्वी, बांगलादेशचा पहिला डाव 150 धावातच गुंडाळळा. मेहदी मिराजला अक्षर पटेलनं बाद केलं. तर भारताकडून कुलदीप यादवने पाच आणि मोहम्मद सिराजने तीन विकेट घेतल्या. 254 धावांची आघाडी मिळाल्यानतंरही भारताने फॉलोऑन न देता दुसरा डाव खेळण्याचा निर्णय़ घेतला.