मुंबई, 8 जानेवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार असून सकाळी 9 वाजता या सामन्यांना सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी रोहित शर्माने पत्रकार परिषदेत पहिल्या सामन्यातील प्लेयिंग 11 बाबत मोठा खुलासा केला. नागपूर येथे होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी रोहित शर्मा पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरा गेला. यावेळी त्याने पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या प्लेयिंग 11 मध्ये कोणाला संधी मिळणार याबाबत इशारा दिला. रोहित शर्मा म्हणाला, ‘शुबमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्याने मध्यंतरीच्या काळात अनेक मोठी शतके झळकावली आहेत. तसेच सूर्यकुमार यादव काय करू शकतो हे आपण पाहिले आहे, परंतु अद्याप या दोघांपैकी कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यायची हे ठरवलेले नाही. शुभमन गिलने अलीकडेच श्रीलंका आणि न्यूझीलंड संघांविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत ज्या प्रकारे धावा केल्या तसाच खेळ जर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात दाखवला तर बॉर्डर गावस्कर मालिकेत भारताचा विजय निश्चित आहे. हे ही वाचा : फुटबॉल विश्वावर शोककळा! तुर्कस्तानमधील भूकंपात फुटबॉलपटूचा दुर्दैवी मृत्यू सध्या नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवरील खेळपट्टीवरून ऑस्ट्रेलियन खेळाडू नाराजी व्यक्त करत विविध गोष्टी बोलत आहेत. अशातच कर्णधार रोहित शर्माने यावर सडेतोड उत्तर दिले. रोहित म्हणाला, ‘आमच्याकडे चार दर्जेदार फिरकीपटू आहेत. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी तर एकत्र भरपूर क्रिकेट सामने खेळले आहेत. तर अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा संघासाठी चांगली कामगिरी केली आहे’. हे ही वाचा : रिषभ पंतवर भडकले कपिल देव! म्हणाले, ‘मी त्याच्या कानाखाली वाजवेन’ भारताला या वर्षी जूनमध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गाठायचा असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही कसोटी मालिका जिंकणं आवश्यक असणार आहे. यापूर्वी 2017 मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या शेवटच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला होता.