दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सामना पारपडणार आहे.
मुंबई, 15 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सामना पारपडणार आहे. ग्रुप स्टेजमधील भारताचा हा दुसरा सामना असून पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय मिळवला होता. तर वेस्ट इंडीज संघाला 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्यात इंग्लंड कडून पराभव पत्करावा लागला. आजच्या सामन्याकडे क्रिकेटजगताचे लक्ष लागले असून या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या दरम्यान महिला टी 20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यंदा वर्ल्ड कप स्पर्धेत 10 संघांचा सहभाग असून यांचे दोन ग्रुपमध्ये विभाजन करण्यात आले आहे. यातील ग्रुप B मध्ये इंग्लंड, आयर्लंड, वेस्टइंडीज सह भारत आणि पाकिस्तान या संघांचाही समावेश आहे. पाकिस्तानला नमवून वर्ल्ड कपमध्ये दमदार सुरुवात केल्यानंतर आज भारत स्पर्धेतील दुसरा सामना खेळणार आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याकरता भारतीय संघाच्या प्लेयिंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. स्मृती मानधना दुखापतीमुळे पहिला सामना खेळू शकली नाही. परंतु तिची दुखापत बरी झाली असून वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात ती भारतीय संघात पुनरागमन करू शकते. तर स्मृतीचे पुनरागमन होत असतानाच फलंदाज यस्तिका भाटिया हिला आज प्लेयिंग 11 मधून बाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे. हे ही वाचा : टेनिसमधील निवृत्तीनंतर सानिया मिर्झाची क्रिकेटमध्ये एंट्री, RCB संघाने दिली मोठी जबाबदारी कधी होणार सामना : आज 15 फेब्रुवारी रोजी भारत वेस्ट इंडिज यांच्या महिला क्रिकेट संघांमध्ये ग्रुप स्टेजचा दुसरा सामना रंगणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेतील न्यूलँड्स क्रिकेट ग्राऊंड मध्ये होणार आहे. सायंकाळी साडे सहा वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होईल.
कुठे पाहाल सामना : भारतात महिला टी 20 वर्ल्डकप 2023 चे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे. याचबरोबर हा सामना डिझनी+हॉटस्टारवर देखील लाईव्ह पाहता येतील. भारताचा टी 20 महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवाणी, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड.