JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करणं बॉलरला पडलं महाग! ICC ने ठोठावला दंड

विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करणं बॉलरला पडलं महाग! ICC ने ठोठावला दंड

इंग्लंडचा खेळाडू सॅम करन याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात फलंदाजाची विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करणं महाग पडलं. आयसीसीने त्याला मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 फेब्रुवारी : आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक बोली लागलेल्या इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूवर आयसीसीने दंड ठोठावला आहे. इंग्लंडचा खेळाडू सॅम करन याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात फलंदाजाची विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करणं महाग पडलं. आयसीसीने त्याला मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावला आहे. दक्षिण आफ्रिकेतील ब्लूमफॉन्टेन येथे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये वनडे मालिका खेळवली जात आहे. नुकताच मालिकेतील दुसरा सामना पारपडला. या सामन्यात 28 व्या ओव्हरला दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू  बावुमा शतक ठोकल्यावर बाद झाला. बावुमाला बाद केल्यानंतर सॅम कॅरेनचा संयम सुटला आणि आनंद साजरा करताना तो दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराच्या अगदी जवळ आला. मात्र, नंतर सॅम करनने मॅच रेफरीसमोर आपली चूक मान्य केली.

परंतु आयसीसीने सॅम करनला आचारसंहितेच्या कलम 2.5 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले. याकलमा अंतर्गत  खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ विरुद्धच्या सामन्यादरम्यान असभ्य भाषा किंवा आक्षेपार्ह हावभाव वापरणे समाविष्ट आहे, जे फलंदाज बाद झाल्यावर आक्रमक प्रतिक्रिया निर्माण करू शकतात. आयपीएल 2023 च्या लिलावात पंजाब किंग्जने सॅम करनला 18.5 कोटींना विकत घेतले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या