मुंबई, 30 नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत चांगल्या कामगिरीचा श्रेयस अय्यर, शुभमन गिल आणि संजू सॅमसन यांना फायदा झाला. बुधवारी आयसीसीने वनडे रँकिंग जारी केले आहे. मालिकेत अर्धशतक केल्यानं श्रेयस अय्यरने सहा स्थानांची तर गिल तीन स्थानांची झेप घेतली. दोघेही अनुक्रमे 27 व्या आणि 34 स्थानी पोहोचले आहेत. भारतीय संघाला दुसरा आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द झाल्यानं न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमवावी लागली. न्यूझीलंडविरुद्ध संजू सॅमसनला फक्त एकदा संधी मिळाली. त्याने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 82 धावा केल्या. त्यामुळे तो दहा स्थानांची झेप घेत 82 व्या स्थानी पोहोचला आहे. शिखर धवनला मात्र अर्धशतक केल्यानतंरही फटका बसला असून त्याची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. हेही वाचा : एक खेळाडु किती सहन करेल? सॅमसनवरून पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने BCCIला सुनावलं भारताने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. दोघांचीही एका स्थानाने घसरण झाली. विराट आठव्या तर रोहित नवव्या स्थानावर घसरला. तर न्यूझीलंडच्या टॉम लॅथम आणि केन विल्यम्सननेसुद्धा रँकिंगमध्ये सुधारणा केली. टॉम लॅथमने पहिल्या सामन्यात शतक केलं होतं. त्यामुळे न्यूझीलंडने 300 पेक्षा जास्त आव्हानाचा पाठलाग करून सामना जिंकला होता. हेही वाचा : FIFA WC: अमेरिकेकडून ईराणच्या पराभवानंतर ईराणी नागरिकांनी केला जल्लोष, कारण माहितीय का? लॅथमने 104 चेंडूत नाबाद 145 धावा केल्या होत्या. त्यामुळे तो दहा स्थानांची झेप घेत 18 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने नाबाद 94 धावांची खेळी केली होती. त्यामुळे त्याने आघाडीच्या दहा फलंदाजांमध्ये स्थान मिळवलं. तर लॉकी फर्ग्युसनने क्रमवारीत 3 स्थानांनी झेप घेत 32 व्या क्रमांकावर झेप घेतली. तर मॅट हेन्री हा पाचव्या क्रमांकावर पोहोचला.