हार्दिक पंड्या पत्नी नताशाच्या कुटुंबासह
मुंबई, 26 सप्टेंबर**:** हार्दिक पंड्या हा टीम इंडियाच्या सध्याच्या सर्वोत्तम ऑल राऊंडर खेळाडूंपैकी एक. मैदानातल्या कामगिरीसोबतच हार्दिकची सोशल मीडियातही चांगलीच हवा आहे. इन्स्टाग्रामवरुन तो नेहमीच फोटो-व्हिडीओ शेअर करत असतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर हार्दिक पंड्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे पंड्या आगामी भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेत तो खेळणार नाही. तर टी20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याआधी तो आपला वेळ फॅमिलीसोबत घालवणार आहे. याच दरम्यान हार्दिकनं आज आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. जावई हार्दिक पहिल्यांदा सासुरवाडीत हा व्हिडीओ आताचा नाही. हा व्हिडीओ आहे महिनाभरापूर्वीचा. इंग्लंड दौऱ्यानंतर आणि आशिया कपआधी हार्दिक पंड्या सुट्टीसाठी ग्रीसला गेला होता तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. यादरम्यानं त्यानं आपली पत्नी नताशा स्टॅन्कोविचच्या घरच्यांशी पहिल्यांदा भेट घेतली. मूळची सर्बियाची असलेली नताशा आणि हार्दिक ग्रीसमध्ये फिरण्यासाठी गेले होते. तेव्हा नताशाचं कटुंबही तिथे आलं होतं. यावेळी हार्दिकला भेटल्यानंतर नताशाची आई भावूक झाली होती.
हेही वाचा - Ind vs SA: हैदराबादवरुन आता थेट केरळचं फ्लाईट… पाहा भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचं टाईमटेबल अनेक वर्ष फोनवरुन संवाद हार्दिकनं हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय… ‘व्हिडीओ आणि फोन कॉल ते अखेर प्रत्यक्ष भेटेपर्यंत.. पहिल्यांदा नताशा (आणि माझ्याही) फॅमिलीला भेटून फार छान वाटलं.’ या भेटीआधी नताशानं आपल्या घरच्यांना कोणतीही कल्पना दिली नव्हती. जेव्हा तिची आई रॅडमिला स्टॅन्कोविच हार्दिकला भेटली तेव्हा ती खूपच भावनिक झाली होती. त्यानंतर जेव्हा हार्दिक आपले सासरे गोरॅन स्टॅन्कोविचना भेटला तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. हे सगळे क्षण नताशानं आपल्या कॅमेऱ्यात टिपले. हा व्हिडीओ तिनं आपल्या यूट्यूब अकाऊंटवर शेअर केला होता. त्यानंतक आता हार्दिकनं ट्विटरवर पोस्ट केला.
अगस्त्यसोबत ग्रीसमध्ये मस्ती हार्दिक आणि नताशानं मुलगा अगस्त्यसह ग्रीसमध्ये मजा मस्ती केली आणि कुटुंबासोबत वेळही घालवला. त्या ट्रिपचे फोटो हार्दिकनं इन्स्टाग्रामवरुन शेअर केले होते.
दरम्यानं मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या नताशाशी हार्दिकनं जानेवारी 2020 मध्ये एन्गेजमेंट केली होती. त्यानंतर कोरोना काळात त्यांनी लग्न केलं. त्याच वर्षी ऑगस्टमध्ये नताशानं मुलाला जन्म दिला. त्याचं नाव त्यांनी अगस्त्य ठेवलं आहे.