नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : टीम इंडियामध्ये एक काळ गाजवलेले अनेक फलंदाज आज संघाबाहेर आहेत. कधी कधी कर्णधार बदलला की दुसरा कर्णधार त्या खेळाडूंना संघात जागा देत नाही. असाच काहीसा प्रकार आयपीएल मास्टर मानल्या जाणाऱ्या सुरेश रैनाबाबत घडला. धोनीनं कर्णधारपद सोडल्यानंतर सुरेश रैनाला टीम इंडियामध्ये जागा मिळाली नाही. आज सुरेश रैनाचा 33वा वाढदिवस आहे. सुरैश रैना म्हटलं की टी-20 क्रिकेटमध्ये त्यांची असलेली बादशाहत दिसून येते. रैना हा पहिला खेळाडू ठरला होता, ज्यानं दक्षिण आफ्रिका विरोधात टी-20मध्ये पहिले शतक केले होते. सुरेश रैनाची ओळख ही मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज होती. त्यानं वेळोवेळी ही ओळख सिध्दही करून दाखवली. पार्ट-टाईम फिरकी गोलंदाज आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण यांच्यामुळे सुरेश रैनानं भारताला अनेक सामन्यात यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू जॉन्टी रॉड्सची त्याची तुलना केली जात असे. वाचा- चेन्नईच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 2021पर्यंत फक्त धोनी…धोनी! मात्र 2018नंतर सुरेश रैनाला टीम इंडियात पुन्हा कमबॅक करता आला नाही. 17 जुलै 2018मध्ये इंग्लंड विरोधात झालेल्या मालिकेत रैनानं शेवटचा एकदिवसीय आणि टी-20 सामना खेळला होता. भारताकडून खेळताना तिन्ही फॉरमॅटमध्ये शतकी खेळी करणाऱ्या खेळाडूंमध्ये एक नाव सुरेश रैनाचेही आहे. 2010मध्ये श्रीलंकेविरोधात पदार्पण करणाऱ्या रैनाच्या नावावर आजही असे रेकॉर्ड आहेत जे रोहित किंवा विराट तोडू शकले नाही. वाचा- विराटनं नाकारल्यानंतरही संजू सॅमसनला संघात मिळाली जागा, BCCIनं सांगितलं कारण
वाचा- टीम इंडियाचा विश्वविक्रम;132 वर्षांच्या इतिहासात अशी ‘कसोटी’ कोणालाच नाही जमली! रैनाला आयपीएलचा किंग मानले जाते. आयपीएलमध्ये सगळ्यात आधी 3 हजार धावांचा टप्पा पार करण्याचा रेकॉर्ड रैनाच्या नावावर आहे. रैना हा एकमेव भारतीय फलंदाज आहे ज्यानं टी-20 आणि एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये शतकी कामगिरी केली आहे. हे रेकॉर्ड विराट किंवा रोहित शर्मा कोणीच मोडू शकणार नाही.
वाचा- रोहितच्या अडचणी वाढल्या, पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सच्या तिजोरीत खडखडाट रैनानं 18 कसोटी सामन्यात 26.48च्या सरासरीनं 768 धावा केल्या आहेत. तर, 226 एकदिवसीय सामन्यात 35.41च्या सरीसरीनं 5 हजार 615 धावा केल्या आहेत. तर, टी-20मध्ये 78 सामन्यात 1 हजार 604 धावा आहेत.