Rashid Khan
मुंबई, 3 मे: आयपीएलच्या 15 व्या(IPL 2022) सीझनमध्ये नव्याने पदार्पण केलेल्या गुजरात टायटन्सचा (GT) संघ सध्या फॉर्मात आहे. या संघाने आत्तापर्यंत 9 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले आहेत. त्यामुळे हा संघ 16 प्वॉइंट्ससह टॉपवर आहे. त्यामुळे संघात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्टार खेळाडू रशीद खान कॅप्टन हार्दिक पांड्याचा मुलगा अगस्त्याला(agastya) घेऊन डान्स करताना दिसत आहे. त्या दोघांचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी आदल्या दिवशी गुजरातचा स्थापना दिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यातीलच एक क्यूट व्हिडीओ रशीद खानने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हा दिग्गज फिरकीपटू गुजरात टायटन्सचा (GT) कर्णधार हार्दिक पांड्याचा मुलगा अगस्त्याला आपल्या मिठीत उचलुन नाचत आहे. बॉलिवूड चित्रपट लवयात्रीच्या गाण्यावर रशीद अगस्त्याला घेऊन डोलताना दिसत आहे.
यावेळी रशीने पिंक कलरचा कुडता तर ज्युनिअर पांड्यानेदेखील एम्ब्रॉईडी केलेला कुडता परिधान केला होता. यामध्ये अगस्त्या खुपच सुंदर दिसत आहे. रशीद खानचा हा व्हिडिओ गुजरात टायटन्सचा (GT) कर्णधार हार्दिक पांड्याची पत्नी नताशानेही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. तत्पूर्वी, गुजरात टायटन्स (GT) च्या संपूर्ण संघाने गुजरात स्थापना दिन साजरा केला. गुजरात टायटन्स (GT) च्या खेळाडूंनीही पारंपरिक लूकमध्ये त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या कार्यक्रमात गुजरात टायटन्सचा (जीटी) कर्णधार हार्दिक पंड्या त्याच्या कुटुंबासह पोहोचला. त्याचा फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
गुजरात टायटन्सने (GT) आतापर्यंत 9 सामन्यांत 8 सामने जिंकले आहेत. संघाचा केवळ 1 सामन्यात पराभव झाला आहे. अशाप्रकारे गुजरात टायटन्स (GT) 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, आणखी 1 सामना जिंकल्यानंतर, गुजरात टायटन्सचे (GT) प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल.