मुंबई, 19 डिसेंबर : अखेर लियोनेल मेस्सीचं स्वप्न पूर्ण झालं, अर्जेंटिनाने फिफा वर्ल्ड कप 2022 जिंकला. फ्रान्सचा 4-2 अशा फरकाने पराभव करत वर्ल्ड कपवर अर्जेंटिनाने नाव कोरलं. स्पर्धेच्या सुरुवातीला अर्जेंटिनाला सौदी अरेबियाकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे अर्जेंटिना सेमीफायनल खेळू शकेल का अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र रोमहर्षक अशा अंतिम सामन्यात मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने जगज्जेतेपद पटकावलं. अर्जेंटिनाच्या विजयानंतर आता सोशल मीडियावर एक ट्विट व्हायरल होत आहे. मेस्सी वयाच्या 34 व्या वर्षी वर्ल्ड कप जिंकेल असं तारखेसह ट्विट एका युजरने 2015 मध्ये केलं होतं. अर्जेंटिनाने सामना जिंकल्यानंतर हे ट्विट व्हायरल होत आहे. यात ट्विटर युजरने दावा केला होता की, 2022 मध्ये कतारमध्ये 18 डिसेंबरला लियोनेल मेस्सी वयाच्या 34 व्या वर्षी पहिला वर्ल्ड कप जिंकेल. तसंच 7 वर्षांनी माझ्याशी बोला असंही ट्विटमध्ये युजरने म्हटलं होतं. आता ही भविष्यवाणी खरी झाल्याचं म्हणत अनेक युजर्नसी ट्विट शेअर केलं आहे. हेही वाचा : अखेर मेस्सीची स्वप्नपूर्ती, अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला
ट्विटर युजर्स हे 7 वर्षे जुनं असलेलं ट्विट आता शेअर करत आहेत. 2015 मध्ये हे ट्विट केलं होतं. यानंतर 2018 च्या वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाला फ्रान्सकडूनच पराभूत व्हावं लागलं होतं. सुपर १६ फेरीतच त्यांचा वर्ल्ड कपमधला प्रवास संपुष्टात आला होता. पण त्या वर्ल्ड कपच्या आधीच तीन वर्षे ट्विटर युजरने सात वर्षांनी मेस्सी वर्ल्ड कप जिंकेल या भविष्यवाणीची चर्चा होतेय.
हेही वाचा : FIFA : वर्ल्ड कप जिंकले तरी विजेत्यांना खरी ट्रॉफी देत नाहीत, कारण… फर्स्ट हाफमध्ये अर्जेंटिनाचे वर्चस्व होते, अगदी सेकंड हाफमध्ये अखेरची काही मिनिटे शिल्लक असताना अर्जेंटिनाच सहज जिंकेल असं वाटत असताना एम्बाप्पेने सलग दोन गोल केले. अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांकडून एक एक गोल झाला. तर पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सच्या दोन पेनल्टी मिस झाल्या आणि अर्जेंटिनाच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं. मात्र, यामुळे फ्रान्सचे सलग दोन वेळा विजेतेपद पटकावण्याचं स्वप्न अधुरं राहिलं.