मुंबई, 18 डिसेंबर : फिफाच्या फायनलमध्ये अतिरिक्त वेळेपर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर पेनल्टी शूटआऊटवर अर्जेंटिनाने बाजी मारली. 4-2 गोल फरकाने सामना जिंकून अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला. यासह लियोनेल मेस्सीचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. सेकंड हाफनंतर सामन्यात बरोबरी झाल्यानंतर अतिरिक्त वेळेत फर्स्ट हाफमध्ये अर्जेंटिनाकडून अखेरच्या काही मिनिटात गोलसाठी प्रयत्न झाले. मात्र फ्रान्सच्या बचाव फळीने हे प्रयत्न हाणून पाडले. पण एक्स्ट्रा टाइममध्ये सेकंड हाफमध्ये मेस्सीने तिसरा गोल नोंदवत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. पण अखेरची काही मिनिटे शिल्लक असताना पेनल्टीवर एम्बाप्पेने गोल करत पुन्हा बरोबरी साधली होती. तत्पूर्वी, फर्स्ट हाफमध्ये अर्जेंटिनाने सामन्यात वर्चस्व राखलं असून २-० अशा गोल फरकाने आघाडी घेतली. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू मेस्सीने २३ व्या मिनिटाला पेनाल्टीवर गोल केला. त्यानतंर ३६ व्या मिनिटाला डी मारियाने गोल नोंदवत अर्जेंटिनाला २-० ने आघाडी मिळवून दिली. सेकंड हाफमध्ये८० व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी मिळाली. यात पेनल्टीवर एम्बाप्पेने गोल नोंदवला. यानंतर एम्बाप्पेने लागोपाठ दुसरा गोल नोंदवला होता. हेही वाचा : गोल केल्यानंतर लिओनेल मेस्सी आकाशात कोणाकडे पाहतो? कारण आहे खास सेकंड हाफनंतर सामन्यात बरोबरी झाल्यानंतर अतिरिक्त वेळेत फर्स्ट हाफमध्ये अर्जेंटिनाकडून अखेरच्या काही मिनिटात गोलसाठी प्रयत्न झाले. मात्र फ्रान्सच्या बचाव फळीने हे प्रयत्न हाणून पाडले. पण एक्स्ट्रा टाइममध्ये सेकंड हाफमध्ये मेस्सीने तिसरा गोल नोंदवत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. पण अखेरची काही मिनिटे शिल्लक असताना पेनल्टीवर एम्बाप्पेने गोल करत पुन्हा बरोबरी साधल्यानं सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटवर लागला.
गतविजेत्या फ्रान्सला २७ व्या मिनिटाला फ्री किक मिळाली होती. तेव्हा ग्रीजमॅनने मारलेला बॉल जिरूडजवळ गेला. तेव्हा फ्रान्सचा डिफेंडर थियो हर्नांडेज आणि लियोनेल मेस्सी एकमेकांना धडकल्यानं फ्रान्सची गोलची संधी हुकली.
अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू मेस्सीने आपला हा शेवटचा वर्ल्ड कप असेल असं आधीच सांगितलं आहे. डिएगो मॅराडोनानंतर मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना चॅम्पियन झाले. फ्रान्सला 2018 मध्ये दुसरा वर्ल्ड कप जिंकून देण्यात एम्बाप्पेने म हत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र यावेळी अखेरच्या क्षणी अर्जेंटिनाने बाजी मारील. १९५८ मध्ये पेले यांनी वयाच्या १७ व्या वर्षी फायनलमध्ये गोल केला होता. त्यांच्यानंतर सर्वात कमी वयात अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू बनला होता.