JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / निवृत्तीच्या वयात IPL चे सामने जिंकणाऱ्या 'या' खेळाडूच्या करिअरला MS धोनीमुळे लागला होता ब्रेक

निवृत्तीच्या वयात IPL चे सामने जिंकणाऱ्या 'या' खेळाडूच्या करिअरला MS धोनीमुळे लागला होता ब्रेक

दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) कोलकाता नाईट रायडर्सचा बदला घेत आरसीबीला (RCB vs KKR) आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला (IPL 2022) पहिला विजय मिळवून दिला. या विजयानंतर फाफ डु प्लेसीसने त्याची तुलना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसोबत केली. पण कधी काळी धोनीमुळेच कार्तिकच्या करिअरला ब्रेक लागला होता.

जाहिरात

ms dhoni

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 31 मार्च: दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) कोलकाता नाईट रायडर्सचा बदला घेत आरसीबीला (RCB vs KKR) आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला (IPL 2022) पहिला विजय मिळवून दिला. कोलकात्याने दिलेलं 129 रनचं माफक आव्हान पार करतानाही आरसीबीचं धाबं दणाणलं होतं, पण अखेरच्या ओव्हरमध्ये कार्तिकने एक सिक्स आणि एक फोर मारून टीमला जिंकवून दिलं. या विजयानंतर फाफ डु प्लेसीसने त्याची तुलना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसोबत केली. पण कधी काळी धोनीमुळेच कार्तिकच्या करिअरला ब्रेक लागला होता. केकेआरविरुद्ध शेवटच्या षटकात आरसीबी संघाला विजयासाठी ७ धावांची गरज होती, त्यानंतर ३६ वर्षीय दिनेश कार्तिकने लागोपाठ चेंडूंवर षटकार आणि चौकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. सामन्यानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनेही दिनेश कार्तिकचे कौतुक केले. पंजाब किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दिनेश कार्तिकने 14 चेंडूत 32 धावा केल्या, ज्यात तीन लांब षटकारांचा समावेश होता. अशा परिस्थितीत आरसीबी संघाला दिनेशच्या रूपाने मजबूत फिनिशर मिळाला आहे. अनेक क्रिकेटपटू वयाच्या 36 व्या वर्षी निवृत्ती घेतात, परंतु दिनेश आपल्या संघासाठी सामने जिंकत आहेत. अशी चर्चा रंगली आहे. करिअरला MS धोनीमुळे लागला होता ब्रेक जोपर्यंत महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) टीम इंडियासाठी खेळत होता, तोपर्यंत दिनेश कार्तिकसाठी संघात स्थान मिळवणे खूप कठीण काम होते. धोनीमुळे त्याला टीम इंडियात जास्त संधी मिळू शकल्या नाहीत. धोनीने 16 वर्षे देशासाठी क्रिकेट खेळले आणि तोपर्यंत कार्तिकला संघात खेळण्याची फार कमी संधी मिळाली. धोनीच्या निवृत्तीनंतर ऋषभ पंतने यष्टिरक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे. कार्तिकने स्वतःच केला होता खुलासा भारतीय क्रिकेट संघात महेंद्रसिंग धोनी आल्यानंतर टीम इंडियाचे सर्व दरवाजे माझ्यासाठी बंद झाले. धोनी आल्यानंतर कार्तिक संघातून बाहेर पडला तो संघात आपले स्थान कायमचे कधीही करु शकला नाही. धोनी संघात सामील होण्यापूर्वी कार्तिकने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि त्याला टीम इंडियामध्ये स्वतःसाठी स्थान मिळवण्याची संधीही अनेकवेळा मिळाली, पण या संधीचा तो फायदा घेऊ शकला नाही. तसेच धोननीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकताच अनेक यष्टिरक्षकांची कारकीर्द संपली. जेव्हा त्याला कर्णधारपद मिळाले तेव्हा कोणत्याही यष्टीरक्षकाला धोनीची जागा घेण्याची संधी नव्हती असही त्यावेळी कार्तिकने मत व्यक्त केले होते. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिस याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि केकेआरला 128 रनवर रोखलं. वानिंदु हसरंगाने (Wanindu Hasaranga) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. आकाश दीपला 3, हर्षल पटेलला 2 आणि मोहम्मद सिराजला एक विकेट घेण्यात यश आलं. केकेआरकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 25 रन केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या