धोनीच्या घरी नवीन कार
रांची, 18 नोव्हेंबर: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत राहतो. गेल्या काही दिवसात आयपीएलच्या रिटेन्शन विंडोमुळे धोनी चर्चेत होता. आणि आता एका वेगळ्या कारणासाठी धोनीच्या नावाची चर्चा होतेय. सध्या धोनी त्यांच्या होम टाऊनमध्ये म्हणजेच रांचीत आहे. याचदरम्यान धोनीच्या घरी एका नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. ही नवी पाहुणी कोण तुम्हाला माहित आहे? तर ती आहे तब्ब्ल 65 लाखांची नवी कोरी किआ EV 6 कार. केदार जाधव, ऋतुराज रांचीत दरम्यान धोनीच्या नव्या कारमधून राईड करण्यासाठी सीएसकेकडून खेळलेला केदार जाधव आणि युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड धोनीच्या रांचीतल्या घरी पोहोचले. यावेळी धोनीनं त्या दोघांना घेऊन आपल्या नव्या कारमधून रांचीच्या रस्त्यांवर फेरफटका मारला. महाराष्ट्र संघातून खेळणारे केदार जाधव आणि ऋतुराज सध्या विजय हजारे ट्रॉफीच्या निमित्तानं रांचीत आहेत. याचवेळी त्यांनी धोनीचीही भेट घेतली.
हेही वाचा - FIFA WC 2022: पोलंड फुटबॉल टीमच्या विमानामागे लढाऊ विमानं, पण का? Video Viral कशी आहे धोनीची नवी कार? धोनीच्या गॅरेजमध्ये कार आणि बाईक्सचं मोठं कलेक्शन आहे. त्याच्याकडे हमर, फोर्डसारख्या आलिशान गाड्या आहेत. त्यात आता या नव्या गाडीची भर पडली आहे. कोरियन कंपनीची KIA कार इलेक्ट्रिक कार आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही गाडी 708 किमी पर्यंत जाऊ शकते. या गाडीची एक्स शोरुम किंमत भारतात जवळपास 60 ते 65 लाख इतकी आहे.