JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Cricket: 'त्या' रन आऊटबाबत दिप्ती शर्मानं केला खुलासा, भारतात पोहोचताच दिप्ती म्हणाली...

Cricket: 'त्या' रन आऊटबाबत दिप्ती शर्मानं केला खुलासा, भारतात पोहोचताच दिप्ती म्हणाली...

Cricket: लॉर्ड्स वन डेत नॉन स्ट्रायकर एन्डला दिप्ती शर्मानं नॉन स्ट्रायकर एन्डला केलेल्या रन आऊटवरुन सोशल मीडियाससह अख्ख्या क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा झाली. पण इंग्लंड दौऱ्यावरुन भारतात परतलेल्या दिप्ती शर्मानं याबाबत मोठा खुलासा केला आहे.

जाहिरात

'त्या' रनआऊटबाबत दिप्ती शर्मानं केला खुलासा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 सप्टेंबर: इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर भारतीय महिला संघानं नवा इतिहास घडवला. इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेतला शेवटचा सामना जिंकून भारतानं इंग्लंडला त्यांच्याच मैदानात पहिल्यांदाच व्हाईटवॉश दिला. हरमनप्रीत कौरच्या या वुमन ब्रिगेडच्या कामगिरीचं कौतुक तर झालंच पण याच सामन्यातल्या एका घटनेची चर्चा अजूनही रंगतेय. भारताच्या दिप्ती शर्मानं इंग्लंडच्या डीनला शेवटच्या विकेटच्या रुपात नॉन स्ट्रायकर एन्डला रन आऊट केलं आणि याच रन आऊटवर सोशल मीडियाससह अख्ख्या क्रिकेट वर्तुळात याची जोरदार चर्चा झाली. पण इंग्लंड दौऱ्यावरुन भारतात परतलेल्या दिप्ती शर्मानं याबाबत मोठा खुलासा केला आहे. आधीच दिली होती वॉर्निंग… ‘इंग्लंडची शार्ली डीन त्या सामन्यात अनेक वेळा बॉल टाकायच्या आधीच क्रीझबाहेर जात असल्याचं भारतीय खेळाडूंच्या लक्षात आलं. त्यावेळी याबाबतीत आम्ही तिला समज दिली होती आणि त्याबाबत अम्पायर्सना पण याची कल्पना दिली होती’ असं दिप्तीनं म्हटलं आहे. अखेर इंग्लंडला 17 धावा हव्या असताना दिप्तीनं चलाखीनं डीनला रन आऊट केलं. यावेळी थर्ड अम्पायरनंही तिला आऊट दिलं आणि हा सामना भारतानं 16 धावांनी जिंकला. पण या घडलेल्या प्रकाराबाबत इंग्लंडच्या खेळाडूंनी मात्र नाराजी व्यक्त केली होती. सोशल मीडियातही अनेक इंग्लिश क्रिकेटर्सनी यावर टिप्पणी केली.

हेही वाचा -  Hardik Pandya: जेव्हा हार्दिक पंड्या पहिल्यांदा सासरच्या मंडळींना भेटतो… हार्दिकनं शेअर केला इमोशनल Video सर्व काही नियमानुसार-एमसीसी दरम्यान बदललेल्या नियमानुसार लॉर्ड्स वन डेत कोणताही चुकीचा निर्णय दिला नसल्याचं क्रिकेट नियमांचं संरक्षण करणाऱ्या मेरिलिबोन क्रिकेट क्लबनं म्हटलं आहे. एमसीसीनं यााबाबत काल तसं पत्रकच जाहीर केलं आणि त्याद्वारे बॅट्समनना एक प्रकारे इशाराही देण्यात आला. एमसीसीनं आपल्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलंय… ‘बॉलरच्या हातून बॉल सुटेपर्यंत नॉन स्ट्राईकर एन्डच्या बॅट्समननं क्रीझच्या आत असावं. तेव्हाच काल जे घडलं ते होणार नाही. कालचा निर्णय नियमाला धरुन होता.’

हरमनकडून दिप्तीची पाठराखण शनिवारचा तो सामना संपल्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं दिप्ती शर्माची पाठराखण केली होती. दिप्तीच्या त्या कृतीवर अनेकांनी नाराजी व्यक्त करताना हे खेळभावनेला धरुन नसल्याचं म्हटलं होतं. पण हरमननं मात्र यावर खडे बोल सुनावले. ‘आम्ही त्याआधी इंग्लंडच्या 9 विकेट्स काढल्या होत्या. मला वाटतं आता प्रत्येकजण यावर बोलेल. पण मी माझ्या प्लेयरला सपोर्ट करते. सगळ काही झालं ते नियमांना धरुन होतं.’ असं हरमन म्हणाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या